डेव्हिड ससून ग्रंथालयभारताच्यामुंबई शहरातील मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय शहराच्या मध्यवर्ती भागात कालाघोडाजवळ रॅम्पार्ट रो येथे एल्फिन्स्टन महाविद्यालय, वॉट्सन्स होटेल आणि आरमारी तसेच सैन्यदलाच्या मोठ्या इमारतींच्या अगदी जवळ आहे.
हे ग्रंथालय अल्बर्ट ससून याने आपले वडील डेव्हिड ससून यांच्या नावे बांधले.[१] या इमारतीची उभारणी स्थानिक मालाड यलो स्टोन प्रकारच्या दगडांनी करण्यात आली. या उभारणीस १,२५,००० रुपये खर्च आला, पैकी ६०,००० आल्बर्ट ससूनने तर उरलेला खर्च बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारने उचलला.[२]