डेव्हिड शूलमन


डेव्हिड डीन शूलमन (१३ जानेवारी. इ.स. १९४९:वॉटर्लू, आयोवा, अमेरिका - ) हे अमेरिकी भारतीय प्राच्यविद्या संशोधक आहेत. राष्ट्रीय विद्यावृत्तीवर वॉटर्लू माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर ते इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले.

यहूदी वंशीय शूलमन हे युरोपीय अभिजात तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील भारतीय प्राच्यविद्येतील विद्वान समजले जातात.

प्राध्यापकी कारकीर्द

जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात ते इंडियन स्टडीज अँड कॅम्पॅरिटिव्ह रिलिजन या विभागात प्राध्यापक होते. ते त्याच विद्यापीठात रेनी लॅंग अध्यासनाचे प्रमुख आहेत. १९८८ पासून ते इस्रायलच्या विज्ञान व मानव्यशास्त्र अकादमीचे सदस्य आहेत. हिब्रू भाषेत त्यांनी कविताही केल्या आहेत. ते साहित्य समीक्षक, सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ असून इस्रायलमधील संस्कृत वाचनालयासाठी ते प्रयत्‍नशील आहेत.

भाषा शिक्षण

पर्शियन भाषेच्या शिक्षकांनी त्यांना सांगितले होते की, हिब्रू विद्यापीठात चिनीजपानी भाषा शिकणासाठी उत्सूक असलेले अनेक विद्यार्थी आहेत पण भारतीय भाषा शिकायची कुणाची तयारी नाही तेव्हा तू भारतीय भाषा शीक. भारताविषयी त्यांना काही माहिती नव्हते म्हणून त्यांनी त्यांचे मित्र डॅनियल स्पर्बर यांचा सल्ला घेतला. स्पर्बर अनेकदा बंगालमध्ये येऊन गेले आहेत. रबिन या दुसऱ्या प्राध्यापकांनीही शूलमन यांना भारतीय भाषा शिक्षणाची प्रेरणा दिली. इंटेरियर लॅंडस्केप हे ए.के. रामानुजम यांचे पुस्तक शूलमन यांच्या वाचनात आले. नंतर त्यांनी तामिळ भाषेचा अभ्यास केला.

भाषाप्रभुत्व

डेव्हिड शूलमन यांचे संस्कृत, हिब्रू, इंग्लिश, हिंदी, तामिळ व तेलुगू भाषांवर प्रभुत्व आहे.

२००६ मध्ये तिरुअनंतपुरम येथे त्यांचे भाषण झाले होते. हे सहसा अमेरिकन इंग्लिशमध्ये बोलत असले तरी त्या संस्कृत, तामिळ भाषेची पखरण करतात.

दक्षिण भारतातील धार्मिक इतिहास, भारतीय काव्य, तामिळ इस्लाम, द्रविडी भाषासंस्कृती व कर्नाटकी संगीत यांचाही अभ्यास त्यांनी केला आहे.

लेखन

शूलमन यानी वेलचेरू नारायण रावसंजय सुब्रह्मण्यम यांच्याबरोबर दक्षिण भारतीय संस्कृतीवर वीस पुस्तकांचे लेखन केले आहे.

पुरस्कार

डेव्हिड शूलमन जीवनकार्याबद्दल त्यांना इस्रायल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!