टिमोथी डेव्हिड टिम पेन (८ डिसेंबर, १९८४:होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
पेनने १३ जुलै, २०१० रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७६ कसोटी सामन्यांमध्ये न खेळलेल्या पेनला नोव्हेंबर २०१७मध्ये पुन्हा संघात स्थान मिळाले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना संघनायक स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघातील खेळाडूला चेंडूत अफरातफर करण्यास उद्युक्त केल्यामुळे त्या पदांवरून पायउतार व्हावे लागले तेव्हा पेनला काळजीवाहू संघनायक करण्यात आले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|