झोजी लाहिमालयातील एक उंच डोंगराळ प्रदेश आहे जो भारताच्यालडाख केंद्र शासित प्रदेशात आहे. द्रास मध्ये स्थित, ही खिंड काश्मीर खऱ्याच्या पश्चिमेस आणि द्रास आणि सुरू खोरे त्याच्या ईशान्येकडे व पुढील पूर्वेस सिंधू घाटी आहे.
हिमालयीन पर्वतरांगाच्या पश्चिम भागात श्रीनगर आणि लेह दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग १ या खिंडीत आहे. दरवर्षी मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहनांचा प्रवाह हिवाळ्यामध्ये थांबत असल्याने झोजी-ला बोगद्याचे बांधकाम आता सुरू झाले आहे.
कधीकधी याला "झोजिला खिंड" म्हणून संबोधले जाते जी एक अपसंज्ञा आहे आणि "खिंड" हा प्रत्यय निरर्थक आहे कारण "ला" या शब्दाचा अर्थ तिबेट, लडाखी आणि हिमालयीन प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बऱ्याच भाषांमध्ये खिंड हा आहे. इतर उदाहरणे आहेत सिक्कीम-तिबेट सीमेवरील नाथू ला, लेह-मनाली महामार्गावर बाराचाला, खार्दुंग ला, फोतु ला, नामिकाला आणि पेंसी ला, वगैरे.
स्थळ
झोजी ला जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी श्रीनगरपासून सुमारे १०० कि.मी. आहे आणि सोनमर्ग पासून किमी १५ किमी. हे लडाख आणि काश्मीर खोरे यांच्यातला महत्त्वपूर्ण दुवा आहे. ही खिंड अंदाजे ३,५२८ मीटर (११,५७५ फूट) उंचीवर चालते आणि श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील फोतु ला नंतरची सर्वात उंच खिंड आहे. सीमा रस्ते संघटना (बीआरओ) हिवाळ्यातील रहदारी अधिक कालावधीपर्यंत वाढविण्याचे काम करीत असले तरी हा रास्ता बहुतेकदा हिवाळ्यादरम्यान बंद असतो. बीआरओचे बीकन फोर्स युनिट हिवाळ्यादरम्यान रस्ता साफ करण्यासाठी आणि देखभाल करण्यास जबाबदार आहे. हिवाळ्यात खिंडीतून जातांना दोन्ही बाजूंच्या बर्फाच्या जाड भिंती दरम्यान वाहनचालवावे लागते.
भारत-पाकिस्तान युद्ध १९४७-१९४८
१९४७-१९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी लडाख ताब्यात घेण्याच्या मोहिमेमध्ये झोजीला पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतले. १ नोव्हेंबर रोजी ऑपरेशन बायसनच्या नावाने झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याने अनपेक्षितपणे रणगाडे उतरवून ही खिंड पुन्हा ताब्यात घेतली. त्यावेळी ही लढाई जगातील सर्वाधिक उंचीवर रणगाडे वापरलेली लढाई होती.[२]
झोजीला बोगदा
झोजीला बोगद्याच्या प्रकल्पाला जानेवारी २०१८ मध्ये भारत सरकारने मंजूरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१८ मध्ये याचे बांधकाम सुरू झाले.[३] १४ किमी लांबीच्या बोगद्यामुळे झोजीला पार करण्यासाठी लागणारा वेळ ३ तासांपेक्षा कमी करून अवघ्या १५ मिनिट होईल. बोगद्याची प्रारंभिक किंमत US$९३० million. पूर्ण झाल्यावर, तो आशियातील सर्वात लांब द्विदिशाही बोगदा असेल.[४][५]