लेह हे भारताच्यालडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. लेह शहर हिमालय पर्वतरांगेत सिंधू नदीच्या काथावर समुद्रसपाटीपासून ११,५०० फूट उंचीवर वसले आहे. लेहच्या पूर्वेला तिबेटचे पठार तर पश्चिमेला काश्मीरचे खोरे आहेत. ऐतिहासिक काळापासून लडखच्या राजतंत्राच्या राजधानीचे शहर असलेले लेह सिंधू नदीच्या खोऱ्यामधील एक प्रमुख वाणिज्य व व्यापार केंद्र राहिलेले आहे.
इ.स. २०११ साली लेह शहराची लोकसंख्या सुमारे ३०,००० होती. लडाखी, बाल्टी व हिंदी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लेहमधील बहुसंख्य रहिवासी बौद्ध अथवा हिंदू धर्मीय आहेत.