चीनी बौद्ध त्रिपिटक हे चिनी, जपानी, कोरियन आणि व्हियेतनामीबौद्ध धर्मातील विहित बौद्ध साहित्याचा एकूण सारांशीत अंश आहे. त्रिपिटकाच्या पारंपारिक नावाचा (चीनी: 大 藏經; पिनयिन: डैंगजिंग; जपानी: 大 蔵 経 डेझोकाईओ; कोरियन: 대장경 डेजांग्गीओंग; व्हियेतनामी: Đại tạng kinh) अर्थ "सुत्ताचा महान खजिना" हे आहे.
सामग्री
चिनी बौद्ध त्रिपिटकात प्रारंभीच्या बौद्ध संघातील आगम, विनय आणि अभिधम्म ग्रंथाचा समावेश आहे. तसेच अगम्य बौद्ध धर्मातील महायान सुत्त ग्रंथ आहेत.
आवृत्त्या
चिनी त्रिपिटकांच्या पूर्व आशियात विविध ठिकाणी आणि कालखंडानुसार आवृत्ती आहेत. सातव्या शतकातील फांगशान स्टोन सूत्र (房 山石 經) ही पहिली आवृत्ती आहे.[१] प्रारंभिक लुंग त्रिपिटक (龍 藏), जियाक्सिंग त्रिपिटक (嘉興 藏), आणि झाओकेन जिन त्रिपिटक[२] अजूनही पूर्णपणे विद्यमान मुद्रित स्वरूपात आहेत. हे पूर्णपणे काष्टशिल्प स्वरूपातील कोरियन त्रिपिटक आणि चेनलोंग त्रिपिटक आहे. कोरियन किंवा पाल्मन दाजांग्गीओंग त्रिपिटक इ.स. १२३६ आणि इ.स. १२५१ दरम्यान कोरियाच्या गोरियो राजवंशांदरम्यान कोरलेली होती. जी ८१,३४० लाकडी फळ्या (लाकडी ठोकळे) यावर ५,२३,८२,९६० वर्णांमध्ये ज्ञात त्रुटी नसलेल्या स्वरूपात कोरलेले आहेत. हा ग्रंथ हाइन्सा विहार दक्षिण कोरिया येथे संग्रहित आहेत.[३]
सर्वाधिक वापरण्यात येणारी एक आवृत्ती म्हणजे ताइशो शिन्शु दाइझोक्यो (तैशो त्रिपिटाका, 大 正 新 脩 大 藏經).[४]आधुनिक स्वरूपातील आवृत्ती इ.स. १९२४ आणि १९३४ मध्ये तोक्यो येथे १०० खंडांमध्ये प्रकाशित झाले. ज्यास ताइशो कालखंडानंतर नामनिर्देशित करण्यात आले. हे एकमेव पूर्णतः विरामन्हांकित त्रिपिटक आहे.[५]
झुझान्गिंग आवृत्ती (卍 續 藏) , त्रिपिटकच्या दुसऱ्या आवृत्तीस पूरक आहे.
^"Zhao cheng jin zang" 趙城金藏 [Zhaocheng Jin Tripitaka]. Chinese Wikipedia (Chinese भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले. Translated Summary: Over 5,347 scrolls of the original 7,000 plus scrolls have survived to date.Invalid |script-title=: missing prefix (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)