चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे