गिरीश कर्नाड - कानडीत कार्नाड - (जन्म : १९ मे १९३८; - १० जून २०१९), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीयनाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातीलमाथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कार्नाडांच्या आई कृष्णाबाई मानकीकर या विधवा होत्या. त्यांना एक अपत्य होते. परिचारिका म्हणून प्रशिक्षण घेत असताना त्यांची ओळख बॉम्बे मेडिकल सर्विसेस मधल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. विधवा पुनर्विवाहच्या त्यावेळच्या पूर्वग्रहांमुळे त्यांना पाच वर्षे लग्न करता आले नाही. त्यानंतर आर्य समाजाच्या रितीनुसार त्यांनी लग्न केले. गिरीश कर्नाड हे चार पैकी तिसरे अपत्य होत.
शिक्षण
कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. कर्नाड त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.[१]गिरीश कार्नाड कर्नाटक आर्टस् महाविद्यालयातून गणित आणि संख्याशास्त्र या विषयातून बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर इंग्लंड येथे तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशात्रमध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९६२ मध्ये त्यांची ऑक्सफर्ड युनिअनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
चित्रपट
गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्. एल्. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.[२]
गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.
गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.[३]
कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक कानडी नाटकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहिलेल्या नाटकांची इंग्रजी आणि काही इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
अग्नी मत्तू मळे (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवाद, 'अग्नी आणि पाऊस', अनुवादक - सरोज देशपांडे)
काटेसावरी (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)
टिपू सुलतानचे स्वप्न (मूळ कानडी, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते.[५]
बाह्य दुवे
भारतीय। रंगभूमीवरील कर्नाड पर्वाचा अस्त:-
गिरीश कर्नाड यांच्या रूपाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे.
'ययाती' हे गिरीश कर्नाड यांचे पहिले नाटक. महाभारतातील यायातीच्या कथानकाच्या आधारे त्यांने भरतीय कुटुंब व्यवस्थेच्या मानसिकतेचा शोध घेतला आहे. प्रत्येक पिढीला वं शं परं परेने मिळणारे घराण्याचे उत्तरदायित्व, जबाबदाऱ्या, आणि अपेक्षांचे ओझे, त्या विरोधात नवीन पिढीची मुक्ततेची इछ्या आणि त्यातून निर्माण होणारा दोन पिढीमधला संघर्ष या नाटकात उभा केला आहे.
नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्णड यांची निवड यूनेस्को आंतरराष्ट्रीय थियेटर संस्थेने वर्ल्ड थिएटरच्या राजदूत म्हणून केली होती.
पॅरिस-आधारित संस्थेने एक दर्जन कलाकारांना हा विशेष सन्मान दिला आहे. यात ब्रिटिश थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक, इटालियन नाटककार डारियो फॉ, फ्रेंच नाटककार अरियन माचिन्के आणि जर्मन नृत्य दिग्दर्शक पिना बास्क यांचा समावेश आहे.
कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्लिश भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वतःला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले. मा.गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे.
10 जून 2019 या दिवशी भारतीय रंगभूमीवरील कर्नाड पर्वाचा अस्त झाला.