के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर (पुणे)

के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर (पुणे)
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
स्थापना इ.स. १९१२
संस्थापक श्रीनिवास मुदलियार
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
महत्त्वाच्या व्यक्ती डॉ.बानू कोयाजी
सेवा वैद्यकीय सेवा
मालक के ई एम हॉस्पिटल सोसायटी
संकेतस्थळ http://www.kemhospital.org/

के ई एम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक पुण्यातले जुने रुग्णालय आहे. हे रुग्णालय मुळात सरदार श्रीनिवास मुदलियार यांनी सुरू केलेले चार खाटांचे धर्मार्थ प्रसूतीगृह होते. पुढे याचे नाव किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल असे ठेवण्यात आले. १९४४ साली येथे ४० खाटांचे रुग्णालय, एक शस्त्रक्रिया-गृह, एक प्रसूतिगृहपरिचारिका निवास होते. १९४४ मध्ये डॉ.बानू कोयाजी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. १९६७ मध्ये रुग्णालय २०० खाटांचे झाले व तिथे वैद्यकीय, शल्यचिकित्साबालरोग हे नवीन विभाग सुरू झाले.

सध्या(सन २०११) रुग्णालयात ५५० खाटा आहेत व रुग्णसेवेबरोबर वैद्यकीय शिक्षण सुरू झाले आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!