किंबर्ली जेनिफर किम गार्थ (२५ एप्रिल, इ.स. १९९६:डब्लिन, आयर्लंड - ) ही एक आयरिश-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे, जी सध्या व्हिक्टोरिया, मेलबर्न स्टार्स आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळते. एक अष्टपैलू खेळाडू असलेली किम, उजव्या हाताने मध्यम गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, २०१० ते २०१९ दरम्यान, तिने आयर्लंड संघासाठी १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले. डिसेंबर २०२२ मध्ये तिने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
हिची आई ॲन-मरी मॅकडॉनल्ड आणि वडील जोनाथन गार्थ दोघेही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.