आफ्रिकन मोर

आफ्रिकन मोर उर्फ
काँगो मोर
(डावीकडे) आफ्रिकन मोर आणि (उजवीकडे) लांडोर
(डावीकडे) आफ्रिकन मोर आणि (उजवीकडे) लांडोर
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
जातकुळी: आफ्रोपावो
जीव: काँगेंसिस
शास्त्रीय नाव
आफ्रोपावो काँगेंसिस
जेम्स कॅपिन, १९३६
इतर प्रकार

पावो क्रिस्टॅटस (भारतीय मोर)
पावो म्युटिकस (हिरवा मोर)
आफ्रोपावो काँगेंसिस (आफ्रिकन मोर)

आफ्रिकन मोर किंवा काँगो मोर (वैज्ञानिक नाव:Afropavo congensis), ही आफ्रिकेच्या कांगो खोऱ्यातील मूळ मोराची एक प्रजाती आहे.[] ही जगातील तीन मोर प्रजातींपैकी एक आहे आणि आफ्रिकेतील मूळ पाव्होनिना उपकुटुंबातील एकमेव सदस्य आहे.[] या जातीची आय.यू.सी.एन. लाल यादी मधील असुरक्षित प्रजाती वर्गात नोंद करण्यात आली आहे.[]

डॉ. चॅपिन यांच्या निरीक्षणानुसार मूळ काँगोलीज लोक आपल्या डोक्यावर लांब लाल-तपकिरी पिसे लावत असत जी चॅपिन यांना माहीत असलेल्या पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीत दिसून येत नव्हती. नंतर, चॅपिन यांनी मध्य आफ्रिकेच्या रॉयल म्युझियमला भेट दिली आणि 'भारतीय मोर' असे लेबल असलेले समान पिसे असलेले दोन नमुने पाहिले. यावरून त्यांनी काँगो मोर, पूर्णपणे भिन्न प्रजाती असल्याचे नोंदवले. इ.स. १९५५ मध्ये चॅपिन यांना या प्रजातींचे सात नमुने शोधण्यात यश मिळाले. काँगो मोरात मोर आणि गिनीफॉल या पक्षांची शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे ही प्रजाती दोन कुटुंबांमधील दुवा असल्याचे मानण्यात येते.[]

आफ्रिकन लांडोरीचे डोके
आफ्रिकन मोराचे डोके

या प्रजातीच्या नराची लांबी ६४–७० सेंमी (२५–२८ इंच) पर्यंत मोठी आढळते. ही लांबी त्याच्या भारतीय मोर या चुलत भावांपेक्षा खूपच कमी आहे. यातील नराचे पंख धातूच्या हिरव्या आणि जांभळ्या छटासह गडद निळे आहेत. त्याला उघड लाल मानेची त्वचा, राखाडी पाय आणि चौदा शेपटीची पिसे असलेली काळी शेपटी आहे. त्याचा मुकुट उभ्या पांढऱ्या लांबलचक केसांसारख्या पंखांनी सजलेला आहे. मादी (लांडोर) ची लांबी ६०–६३ सेंटीमीटर (२४–२५ इंच) पर्यंत आढळून येते आणि सामान्यत: काळ्या उदर, धातूचा हिरवा पाठ आणि एक लहान चेस्टनट तपकिरी शिखा असलेला तांबूस पिंगट तपकिरी पक्षी आहे. ही प्रजाती अपरिपक्व आशियाई मोर असल्या सारखे दिसतात.[]

वितरण आणि निवासस्थान

आफ्रिकन मोर किंवा काँगो मोर हा काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकच्या मध्य काँगोलियन सखल जंगलातील स्थानिक जीव आहे, जिथे त्याला राष्ट्रीय पक्षी देखील नियुक्त केले गेले आहे. हा पक्षी सालोंगा राष्ट्रीय उद्यानातील प्राथमिक आणि दुय्यम जंगलात आढळतो. मोराची विष्ठा आणि पिसे यांसारख्या त्याच्या उपस्थितीची दुय्यम चिन्हांवरून त्याच्या उपस्थितीची नोंद घेतली असता असे निदर्शनास आले की, मुख्य जंगलापेक्षा दुय्यम विरळ जंगलात हे पक्षी अधिक वेळा आढळतात. दुय्यम जंगलात, त्यांची विष्ठा पानवट्याच्या जवळ आढळली, जिथे लहान मोठी झाडे होती आणि वनस्पतींची विविधता देखील प्राथमिक जंगलापेक्षा कमीच होती.[]

वर्तन आणि पर्यावरणशास्त्र

काँगो मोर हा एक सर्वभक्षी पक्षी आहे ज्याचे मुख्य भक्ष्य फळे आणि कीटक असतात. सालोंगा नॅशनल पार्कमध्ये नोंदवल्या नुसार त्यांच्या आहारात अ‍ॅलनब्लॅकिया फ्लोरिबुंडा, कॅनेरियम श्वेनफुर्थी, ऑइल पाम, क्लेनेडोक्सा गॅबोनेन्सिस, आफ्रिकन ब्रेडफ्रूट, आणि झायलोपिया एथिओपिका ची फळे व बिया तसेच अनेक कीटक, कोळी आणि मॉक्सस इत्यादीचा समावेश दिसून आला.[]

सालोंगा नॅशनल पार्कमध्ये, मुख्य जंगलापेक्षा दुय्यम जंगलात त्याच्या आहाराची यादी वरील नोंदीपेक्षा कमीच आहे. नराचे मिलनाच्या वेळचे पिसारा फुलवून नाचण्याचे प्रदर्शन मोराच्या इतर प्रजातींसारखेच असते. काँगो मोरात प्रत्यक्षात त्याच्या शेपटीला जोडून त्याचा पिसारा असतो, तर इतर मोरात त्यांच्या पाठीवरून शेपटीच्या गुप्त पंखांना पिसारा असतो. काँगो मोर एकपत्नी आहे असे दिसून आले आहे. या प्रजातीचे मोर उंच आवाजात "गोवे" अशा अशी साद घालतात, तर लांडोर कमी उंचीत "गोवा" अशी प्रतिसाद देते. या जातीत दोन्ही लिंगांचे रो-हो-हो-ओआ असे सूर असलेले मोठे द्वंद्वगीते प्रसिद्ध आहेत. 

उपलब्धता आणि संवर्धन

खाणकाम, स्थलांतरित लागवड आणि वृक्षतोड यामुळे काँगो मोरांचा अधिवास नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळेच ही प्रजाती धोकादायक वर्गवारीत नोंदवला गेला. []

मिलवॉकी काउंटी प्राणीशास्त्र उद्यानातील महिला
ओक्लाहोमा सिटी प्राणीसंग्रहालयातील नर

IUCN रेड लिस्टमध्ये काँगो मोर असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. इस २९१३ पर्यंत, या मोराची नैसर्गिक जंगलातील उपलब्ध प्रौढांची संख्या २,५०० ते ९,००० पर्यंत होती. [] सालोंगा नॅशनल पार्कमध्ये पुनरुत्पादित जंगलाचा वापर लक्षात घेता, संवर्धन धोरणामध्ये समाविष्ट करण्यासाठी दुय्यम जंगले एक महत्त्वपूर्ण अधिवास असू शकतात. [][]

संदर्भ

  1. ^ a b c BirdLife International (2016). "Afropavo congensis". IUCN Red List of Threatened Species. 2016: e.T22679430A92814166. doi:10.2305/IUCN.UK.2016-3.RLTS.T22679430A92814166.en. 19 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Dowsett, R. J.; Forbes-Watson, A. D. 1993.
  3. ^ a b c M. Mulotwa, M. Louette; A. Dudu Upoki, R. A. Fuller (2010). "Congo Peafowl use both primary and old regenerating forest in Salonga National Park, Democratic Republic of The Congo". Ostrich. 81: 1–6. doi:10.2989/00306525.2010.455811.
  4. ^ "Congo Peafowl". World Association of Zoos and Aquariums. 6 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 March 2014 रोजी पाहिले.
  5. ^ BirdLife International (2014) Species factsheet: Afropavo congensis.
  6. ^ M. Mulotwa, Louette M.; Dudu A., Upoki A. (2006). "The Congo Peafowl Afropavo congensis in Salonga National Park (Democratic Republic of Congo)". Malimbus (28): 52–53.
  7. ^ Hart, J. A. and Upoki, A. (1997). "Distribution and conservation status of Congo peafowl Afropavo congensis in eastern Zaire". Bird Conservation International. 7 (4): 295–316. doi:10.1017/s0959270900001647.CS1 maint: multiple names: authors list (link)
  8. ^ Collar, N. J.; Butchart, S. H. M. (2013). "Conservation breeding and avian diversity: chances and challenges". International Zoo Yearbook. 8 (1): 7–28.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!