या लेखात सत्यापनासाठीअतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीयसंदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते.
मोरकुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे मोराचा नाच हा प्रेशणीय असतो. गोव्यात मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात.
मोराचे एकूण मुख्य तीन प्रकार आढळतात; दोन आशियाई प्रजाती, भारतीय उपखंडातील भारतीय मोर आणि दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर; तसेच आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.
खाद्य
मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात.
वास्तव्य
मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात.
महाराष्ट्रात मोरांचे स्थान
महाराष्ट्रात बऱ्याच गावांजंलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हा पक्षी सरस्वती देवीचे वाहन आहे अशी मान्यता आहे. अर्थात अनेक प्राण्यांना विशिष्ट देवतांशी वा दैवतांशी जोडून त्यांचे जतन केले जावे व नैसर्गिक जीवसाखळी अबाधित राखावी असा विचार त्यापाठी असावा. या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यातशिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतर क्षेत्रातही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मोरांचा मुक्त संचार आहे.झुंडीने आढळतात तसेच मोरांसाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे भारतातीत/महाराष्ट्रातील एकमेव मयुर अभयारण्यात भरपूर प्रमाणात मोर अढळतात व या मोरांचे संरक्षण व संगोपणासाठी वन्यजीव विभागा मार्फत विविध उपक्रम द्वारे मोरांच्या वाढीसाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत.
आवाज
मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात.केकारव म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू...म्यूॅंहू... असा भासतो.
मोराचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
जंगल क्षेत्रातील त्यांच्या जोरदार केकारवामुळे त्यांचा सहजपणे शोध घेता येतो.
प्रकार
पांढरा मोर
पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या जंगलात किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना फीडसाठी बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार(गिलहरी) इ. खातात.वपावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात.
सांस्कृतिक संदर्भ
मोर हे सरस्वती तसेच कार्तिकेय यांचे वाहन आहे. मोराच्या रंगीत पिसाऱ्यामुळे तसेच डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान मिळवले आहे.