आग्नेय इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये तिसऱ्या तर लोकसंख्येनुसार पहिल्या क्रमांकावर असलेला आग्नेय इंग्लंड हा एक सुबत्त प्रदेश आहे. लंडनच्या जवळ असल्यामुळे येथील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. लंडनचा गॅट्विक विमानतळ येथेच असून युरोपला ब्रिटनसोबत जोडणारी बव्हंशी वाहतूक येथून हाताळली जाते.