ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (ग्रीक: Διεθνής Αερολιμένας Αθηνών "Ελευθέριος Βενιζέλος") (आहसंवि: ATH, आप्रविको: LGAV) हा ग्रीस देशाच्या ॲथेन्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०११ मध्ये खुला करण्यात आलेला व ॲथेन्स शहरापासून २० किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ एजियन एरलाइन्स ह्या ग्रीसच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर काही लहान कंपन्यांचा हब आहे. २०१४ साली अथेन्स विमानतळ युरोपातील ३१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.