हूनान (चिनी लिपी: 湖南 ; फीनयिन: Húnán) हा चीन देशाच्या मध्य-दक्षिण भागातील एक प्रांत आहे. यांगत्सेच्या भोऱ्याच्या मध्यभागात स्थित असलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला हुबेई, पूर्वेला च्यांग्शी, दक्षिणेला क्वांगतोंग व क्वांग्शी, पश्चिमेला क्वीचौ तर वायव्येला चोंगछिंग हे राजकीय विभाग आहेत. छांग्षा ही हूनानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०२० साली सुमारे ६.६४ कोटी लोकसंख्या असलेला हूनान चीनमधील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. आधुनिक चीनचा जनक माओ त्झ-तोंग ह्याचे जन्मस्थान हूनान प्रांतामध्येच आहे.
राजकीय विभाग
हूनान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे