चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे.
उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे.
बाह्य दुवे