यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.