लैंगिक शिक्षण

लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते. लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनाना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात. लैंगिकतेशी संबंधित विचार 'विवेकपूर्ण' बनवणे अभिप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय संस्था हा याप्रकारचे शिक्षण देण्याचा एक सयुक्तिक मार्ग समजला जातो.

भारतीय समाजाबद्दल विचार केला असता, कामजीवन आणि लैंगिक शिक्षणाबद्दल बरेच समज गैरसमज समाजात प्रचलित असल्याचे दिसून येते. काही काळापूर्वी पाश्चात्त्य समाजातही औपचारिक लैंगिक शिक्षण देण्याची परंपरा नव्हती. आधुनिक वैद्यक आणि प्रजननशास्त्रातील अद्‌भुत प्रगतीमुळे मानवी समाजातील समज आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक वस्तुस्थिती यात लोकांना स्वाभाविक अतंर जाणवू लागले. समाजातील व्यक्तिगणिक तसेच प्रदेश, जाती, धर्म, समूह, राजकीय विचारप्रणाली, संस्कृती इत्यादींमध्ये कामजीवनाविषयी समजभिन्नता आहे आहे हे निदर्शनास येते.

गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये त्याने गर्भपात होतो असा समज भारत सोडून इतरत्र कोठेही असल्याचे माहीत नाही; आणि आधुनिक वैद्यकशास्त्र अजूनपर्यंत तरी या काळात 'पपई खाऊ नये' असे सिद्ध करू शकलेले नाही. हवामानप्रकृतीनुसार पाळावयाचे पथ्य आणि कुपथ्य या विषयात भारतात जेवढे संकेत आहेत तेवढे आधुनिक वैद्यकशास्त्रात नाहीत.

जीवनसत्त्वाची अधिक आवश्यकता गरोदरपणात असते. ई जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या फक्त पपई या फळात विपुल प्रमाणात असते पण भारतीय समाजातील समजामुळे बहुसंख्य आधुनिक भारतीय वैद्यकांना गर्भवती स्त्रियांची ई जीवनसत्त्वाची गरज इतर कृत्रिम औषधी रसायनांनी भागवण्याचा सल्ला द्यावा लागतो.

शिवीगाळ, बहुतांशी चुकीची असलेली सवंग माहिती पुरवणारे सवंगडी, अश्लील व वैद्यकीयदृष्ट्या अनधिकृत वाड्मय, शौचालये आणि मुताऱ्या हेच दुर्दैवाने भारतातील बहुसंख्य लोकांचे लैंगिक शिक्षणाचे माध्यम रहात आले आहे.

प्रास्ताविक

स्त्रीबीजाच्या मीलनापासून पासून गर्भाशयातील गर्भाची वाढ ते नवीन बालकाचा जन्म तसेच नवीन मनुष्यप्राण्याची उत्पत्ती आणि वाढीबद्दलचे शिक्षण प्रजननविषयक शिक्षणात अंतर्भूत केले जाते. आजकाल बहुतेकवेळा लैंगिक संबधातून पसरणारे संसर्गजन्य रोग, अशा आजारांपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि कुटूंबनियोजनाच्या पद्धती यांचासुद्धा प्रजननविषयक शिक्षणात अंतर्भाव केला जातो.

अंशिक दृष्ट्या अप्रत्यक्ष स्वरूपात लैंगिकशिक्षणाची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा आजकाल प्रयत्न होत असला तरी, असंख्य देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा विवाद्य मुद्दा मानला जातो. खास करून कोणत्या वयापासून लैंगिक शिक्षणाची सुरुवात करावी, किती आणि नेमकी कोणती माहिती दिली जावी, मानवी कामुकते संदर्भात आणि कामजीवना संदर्भात जसे की सुरक्षित कामजीवन, हस्तमैथुन लैंगिक एथीक्स बद्दलचे विषय सामान्यतः चर्चेत असतात.

असंख्य देशात वर उल्लेखल्या प्रमाणे लैंगिंकशिक्षणाच्या स्वरूपावरून बरीच वादळी चर्चा होते. बालवयातील लैंगिक आकर्षणाबद्दल माहिती उपयोगी आहे का निरूपयोगी, निरोध इत्यादी कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती, याचा विवाहबाह्य अपत्यसंभवावरील परिणाम, बालवयातील अपत्यसंभव आणि लैंगिक संबधांमुळे पसरणारे रोग इत्यादी बद्दल माहिती शालेय अभ्यासक्रमात असावी का आणि असली तर स्वरूप आणि किती याबद्दल चर्चा केली जाते. अमेरीकी संयुक्त संस्थाने आणि इंग्लंड इत्यादी कन्झर्वेटीव्ह विचारसरणीच्या देशात लैंगिकसंबधातून पसरणारे संसर्गजन्या आजार आणि आणि बालव्यातील अपत्यसंभावाचे प्रमाण अधिक आढळते कारण त्यांचा भर लैंगिक संबधापासून दूर ठेवण्या परतेच लैंगिक शिक्षण देण्यावर आहे.

'एड्स'च्या आजारामुळे लैंगिकषिक्षणाच्या आवश्यकतेवर अधिक भर दिला जातो आहे. प्लान्ड पॅरेंट हाउस सारख्या काही आंतररास्ह्ट्रीय संस्था लोकसंख्येची वाढ रोखण्याकरिता आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने लैंगिक शिक्षण आवश्यक समजतात.

लैंगिक शिक्षण अभ्यासक्रम

आरोग्य

मुक्त लैंगिक संबंध

प्रतिबंध

कामजीवन आणि लैंगिक विषयांवर उघड चर्चा करणे, प्रश्न विचारणे हे भारतीय समाजात निषिद्ध मानले गेल्याने या विषयाबद्दल समाजात अनेक गैरसमज असल्याचे आढळून येते. उदाहरण द्यायचे झाल्यास, स्त्रीला कामवासना असते याची कल्पनाच नसणाऱ्यांपासून स्त्रीची कामवासना भागवणेच आपले परमकर्तव्य आहे असे समजणारे दोन्ही प्रकारचे वर्ग समाजात आढळतात. काही समाजात विशिष्ट वयांनतर विशिष्ट विधी करून नग्न न होता कपडे घालूनच स्नान करण्यास फर्मावले जाते. हे ज्या काळात पुरेशी स्वतंत्र न्हाणीघरे नव्हती त्या काळातील ही प्रथा असेल पण ती परंपरा आजतागायत जपली जाते, यामुळे जांघेतील त्वचेची स्वच्छता करणे राहून गेले तर त्वचारोग उद्भवतात व त्यांची मोकळेपणे चर्चा न करता त्यांना गुप्तरोग हे विशेषण लावून प्रशिक्षित वैद्यकीय तज्‍ज्ञाकडे जाण्यापेक्षा असंख्य लोक भोंदू लोकांच्या जाहिरातबाजीला बळी पडून बऱ्याचदा विनाइलाज पैसा गमावतात. अनेकदा त्यांना कुसंगतीतील लोक चुकीचे मार्गदर्शन करून वेश्यागमनाचा वाममार्ग सुचवतात किंवा काहीवेळा अल्पवयीनांशी संभोगाचा अत्यंत चुकीचा सल्ला देऊन कायद्याशी आणि माणुसकीशी विनाकारण प्रतारणा करताना आढळून येतात.

तशाचप्रमाणे हस्तमैथुनात होणाऱ्या वीर्यस्खलनामुळे शारीरिक शक्तीचा नाश होतो असाही गैरसमज फार मोठ्या मानवी समूहात आजही प्रचलित आहे. त्वचेच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास हस्तमैथुनात शरीरशास्त्राच्या दृष्टीने काही गैर नाही. त्यामुळे शारीरिक शक्तीचे कोणत्याही स्वरूपात नुकसान होत नाही असे आधुनिक वैद्यकशास्त्र समजते. तसेच शरीराबाहेर वीर्य पडले तरी पुन्हा आपोआप पूर्वीएवढ्याच प्रमाणात नवीन तयार होते याची असंख्य पौगंडावस्थेतील मुले मुली तसेच तरुणांनाही कल्पना नसते.

स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही तशी स्वाभाविक व नैसर्गिक क्रिया असून कोणताही स्पर्शजन्य किंवा संसर्गजन्य आजार निर्माण करत नसली तरी काही मानवी समूहांमध्ये तेवढ्या कालावधीकरिता शिवाशिव पाळावी, तसेच धार्मिक विधीत सहभाग घेऊ नये असा समज आहे तर त्याच वेळी बहुसंख्य इतर मानवी समाजात हा गैरसमज काय आहे याचीसुद्धा कल्पना नसते.

समूह आणि संस्कृतिगणिक विविध श्रद्धा अजाणवयातच मुलांना अथवा मुलींना सक्तीचे ब्रम्हचर्य लादण्यापासून ते सक्तीच्या कौमार्यभंगाच्या परंपरांपर्यंत चालत आल्या आहेत. काही देशात लठ्ठपणा हेच सौंदर्य समजून स्त्रियांना सक्तीचे जेवण देऊन त्या आजारी पडल्या तरी खाऊ घातले जाते तर काही समाजात जेवणही वर्ज्य करवले जाते.

असंख्य पुरूष आपण स्त्रीस लैंगिकदृष्ट्या समाधान देऊ शकू की नाही या न्यूनगंडापायी वेश्यागमन करतात तर असंख्य पुरूषांना आपले शिश्न इतर पुरूषांपेक्षा लहान असल्याचा गैरसमज असतो आणि या गैरसमजातून ते भोंदू बाबांकडे पोहोचतात. वस्तुतः सर्वसाधारणपणे जगातील सर्व पुरूषांच्या लिंगाची लांबी सारखीच म्हणजे ताठरता आल्यानंतर १५ से.मी. एवढीच असते. आणि काही वैद्यकीय अडचणीमुळे या लांबीत काही फरक पडला तरी कोणत्याही स्त्रीची योनी कोणत्याही लांबीशी आपोआप नैसर्गिकरीत्या जुळवून घेते व स्त्रीच्या लैंगिक समाधानात लांबीचा काही संबध नसतो याची असंख्य पुरूषांना कल्पना नसते; तर विवाहानंतर आपल्याला लैंगिक संबधांना सामोरे जायचे आहे याची असंख्य नवपरिणित विवाहित स्त्रियांना कल्पनाच नसते.

कुटुंबकल्याण

मूल न होणाऱ्या आणि तसेच मुलगा न होणाऱ्या स्त्रियांना बऱ्याचदा मानवी समुहात मानहानी सहन करावी लागे, प्रत्यक्षात मूल/मुलगा होण्यास पुरुषसुद्धा बरोबरीने जबाबदार असू शकतात. आजच्या काळात वैज्ञानिक प्रगतीने आधुनिक वैद्यकशास्त्र जवळपास प्रत्येक दांपत्यास अपत्यप्राप्ती करून देऊ शकते.

पूर्वीच्या काळी योनी मार्गातील पातळ पापुद्रा हा कौमार्याचे लक्षण मानले जात असे. समागमाच्या क्रियेत हा पडदा फाटला तर सौम्य रक्तस्राव होत असे, पण रक्तस्राव झाला नाही तर विवाहोत्तर पहिल्या समागमानंतर कित्येक विवाहित जोडप्यांचे संसार सुरू होण्याआधीच मोडत. पण आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार अतिश्रम, पोहणे, पळणे सायकल चालवणे अशा व्यायाम प्रकारांतही हा पडदा फाटतो. याचा अर्थ या पडदा नसणे हे कौमार्य नसल्याचे लक्षण समजू नये.

वैज्ञानिक दृष्ट्या, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया किंवा निरोधाच्या वापरानंतर देखील क्वचित संतति संभवते. पण यास व्यभिचार असे समजण्याची चूक असंख्य पुरुष करत असतात.

पुरूषांच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेने बलहानी होते असा समज काही काळ भारतीय समाजात पसरला होता, या गैर समजाचा राजकीय परिणाम देखील आणीबाणीच्या आणि त्यानंतरच्या काळात अनुभवला गेला. हा गैरसमज दूर करण्याकरता प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी करावी लागली.

शाळेंत 'लैंगिक शिक्षण' हा वेगळा विषय असावा काय? यावर अनुकूल आणि विरुद्ध दृष्टिकोण असतात. "लैंगिक शिक्षणात केवळ शरीराची आणि त्याच्या क्रियांची माहिती देता उपयोगी नाही, तर मुळात स्त्रीला "नाही कधी म्हणायचे हे शिकवले गेले पाहिजे."मुलाला लैंगिक शिक्षण कधी देण्यात यावे", हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न. मूल स्वतःच्या शरीराबद्दल, जन्माबद्दल पहिला प्रश्न विचारते की "मी कुठून आलो?" या प्रश्‍नाचे आईच्या गर्भातून, हे अगदी योग्य उत्तर द्यायला अनेक पालक धजावत नाहीत, कारण त्यापुढील प्रश्न हा गर्भाशय म्हणजे काय? असा असतो; पण आपल्याला त्याचे उत्तर देता येत नाही. आणि त्याहीपेक्षा ते कसे द्यावे हेच कधी सांगितले गेलेले नाही." डॉ. विठ्ठल प्रभू Archived 2007-10-09 at the Wayback Machine.

लैंगिक शिक्षणाच्या बाजूने दृष्टिकोन

लैंगिक शिक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या मंडळींचे असे मत असते की पौगंडावस्थामध्ये शरीराच्या गरजा आपसूकपणे आतून धडका द्यायला लागतात. त्यामुळे त्याचे शिक्षण वगैरे देण्याची गरज नाही. लोक हेही म्हणतात की कित्येक हजार वर्षे माणूस प्रजनन करतो आहेच की, मग आताच शिक्षणाची गरज काय?

कारणे खालीलप्रमाणे आहेत: १. भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली पौगंडावस्था (वयात येण्याचे) वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

२. माध्यमांचा रेटा, विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पॉर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून उतू जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्यापासून या मुलांचा बचाव करायचा असेल तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. लैंगिक सुखाविषयी चुकीच्या किंवा अवास्तव कल्पना याने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.

तसेच समाजात बलात्कार, अल्पवयीन 'वेश्यागमन', 'लैंगिक संबंध'चे प्रकारही आढळतात.

यामागे एकच ठळक कारण दिसते, ते म्हणजे 'लैंगिक शिक्षणा'चा अभाव !

याबद्दल बरेच प्रश्न पडतात - १. भारतात 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे' असे बऱ्याच वेळा का पटवून दिले जाते? की भारतीय संस्कृतीत ही गोष्ट बसत नाही ?

२. सर्व पालक आपल्या 'पौगंडावस्थेतील' मुलांशी, आई मुलीशी एक 'मैत्रीण' आणि 'वडील मुलाशी एक 'मित्र' या नात्याने, मोकळेपणाने का बोलतात का ?

३. किशोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना पालकांनी कसे उत्तर द्यायला पाहिजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय गं?'

४. सर्व शाळांत हा विषय इतर शालेय विषयांसारखा 'सक्तीचा' विषय म्हणून का नाही शिकवला जात ? (काही शाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात) याविषयावरील एखादे 'पाठ्यपुस्तक' का नाही ?

५. प्रसारमाध्यमांमुळे (दूरचित्रवाणी, मासिके इ.) किशोरावस्थेतील मुलांना 'सेक्स' विषयीची कितपत कल्पना मिळते ?

६. जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येऊ शकत नाही काय ?

भारतासारख्या देशात, जिथे आधीच लैंगिक संबंधांबद्दल इतका चोरटेपणा आणि अपराधीपणा आहे, तिथे ही कोंडी फुटावी यात जितक्या लवकर मोकळेपणा याव असे लैंगिक शिक्षणाच्या समर्थकांचे मत पडते.

मुलांना प्रजननाचे कार्य व त्याच्याशी संबंधित रोग व सुरक्षितता याविषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी व मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टिकोण निकोप व्हावा म्हणून शाळेंत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. शास्त्रशुद्ध माहितीसाठी त्यांना जीवशास्त्र या विषयांतर्गत ज्याप्रमाणे पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था यांच्या कार्याची व त्यांना होणाऱ्या रोगांची व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रजननसंस्थेविषयीही माहिती देता येईल.

शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, त्यांची माहिती, कार्य इत्यादींवरही एक धडा असे. शाळेत अनुभवानुसार केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग तरी शिक्षक शिकवीत असत. बहुधा मुलांच्या शाळेतील जीवशास्त्रासाठी शिक्षक आणि मुलींच्या शाळेत जीवशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षिका असतानाच हे होत असे. तरीही पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जात असे तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जात असे. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेमध्ये शिकविताना शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे सदर धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येई. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नसे. तेव्हा हा विषय जीवशास्त्राच्या पुस्तकात अंतर्भूत असल्यामुळे तो वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल असे वाटते.

लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय शिकवायचे?

वयात येताना होणारे शारीरिक, भावनिक बदल, स्त्री-पुरुष संबंध, हस्तमैथुन, मासिक पाळी, गर्भधारणा, समलिंगी संबंध, या सर्वांची वयानुरूप योग्य ती शास्त्रीय माहिती देणे. तसेच गर्भाचे लिंग कसे ठरते इथपासून ते एकतर्फी प्रेम म्हणजे काय? केव्हा करावे, गुप्तरोग, एड्स याही सर्वांची शास्त्रीय माहिती देता येईल. या शिक्षणात मुलींना 'सहेतुक स्पर्श' व 'निर्हेतुक स्पर्श' कसे ओळखायचे, स्वतःला कसे सावरायचे, काही बाबतीत संयम कसा ठेवायचा याचीही माहिती दिली जाते. लैंगिकतेविषयीचे गैरसमज दूर केले जातात. लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनाना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात. लैंगिकतेशी संबंधित विचार 'विवेकपूर्ण' बनवणे अभिप्रेत आहे. ते शिक्षकांनी शिकवून समजणार नाही, त्यासाठी तज्ञच हवेत. महाराष्ट्र टाइम्स निरामय लैंगिक शिक्षण![permanent dead link] लैंगिक शिक्षणाच्या संदर्भात प्रत्येक शालेय संस्थेने एक नियमावली बनवावी आणि त्यातही वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे गट बनवून त्यानुसार शैक्षणिक सामुग्री आणि समुपदेशनाचे विषय अशी रचना केली पाहिजे. वयात येणाऱ्या मुलांना हे शिक्षण द्यायचे असेल, तर सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे प्रश्‍नपेटीचा आहे. मुलांच्या मनात यासंदर्भात जे प्रश्न असतील ते त्यांनी या पेटीच्या माध्यमातून विचारले आणि त्यांची उत्तरे तज्ज्ञांकडून दिली गेली, तर लैंगिक शिक्षणाचा पहिला सकारात्मक टप्पा गाठता येईल. मात्र प्रत्येक गोष्टीचे दृश्य परिणाम व्हायला एका पिढीचा काळ जावा लागतो तितका वेळ आपण द्यायलाच हवा... (डॉ. विठ्ठल प्रभू) Archived 2007-10-09 at the Wayback Machine.

लैंगिक शिक्षणाची सोय

आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची सोय शाळांमध्ये नाहीये पण काही सामाजिक संस्थांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. तसेच या विषयावर बोलणाऱ्या काही उत्तम वेबसाईट मराठीत तयार झालेल्या आहेत. पुण्यातील तथापि ट्रस्ट ही या विषयावर काम करणारी संस्था याचे संचलन करते आहे.

लैंगिक शिक्षणाविरुद्ध दृष्टिकोन

मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टिकोण निकोप होण्याच्या दृष्टीनेही या वेगळ्या विषयाचा कितपत उपयोग होईल ते सांगणे कठीण आहे. 'Gestalt Therapy' या पुस्तकाचे लेखक डॉ. एफ्.एस्.पर्ल्स् यांनी 'Anti-Social and Aggression' या प्रकरणांत मांडलेल्या विचारांप्रमाणे लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटींत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते. आणि त्यामुळेच तिच्यांत एक प्रकारची उत्कटता असते. तिला नियमांच्या चौकटींत बसवून अधिकृत स्वरूप दिल्यास तिच्यांत कृत्रिमपणा येऊन मनुष्य उत्कट अनुभवाला मुकण्याची शक्यता असते. Rank या मानसशास्त्रज्ञाने तर असे म्हंटले आहे की "...the place to learn the facts of life is in the gutter, where their mystery is respected......" "लैंगिक शिक्षण हवे की नको, हवे असल्यास ते कशा प्रकारचे असावे हे ठरवतांना त्याचे तात्कालिक व दूरगामी परिणाम लक्षांत घ्यावे. त्यासाठी मानसशास्त्रांतील अत्याधुनिक संशोधनाची मदत घ्यावी."

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!