लेओ फॉन काप्रिव्ही (जर्मन: Georg Leo von Caprivi; २४ फेब्रुवारी १८३१ - ६ फेब्रुवारी १८९९) हा जर्मन साम्राज्याचा दुसरा चान्सेलर होता. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मने १८९० साली बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर लेओ सत्तेवर आला.
लेओच्या कारकिर्दीत जर्मनीने आपले सौहार्दाचे परराष्ट्रीय धोरण बदलून रशियासोबतचे आर्थिक व लष्करी सहकार्य थांबवले. तसेच लेओने जर्मन लष्करीचे मोठ्या प्रमाणावर सुसूत्रीकरण केले.
बाह्य दुवे