लुधियाना

लुधियाना
ਲੁਧਿਆਣਾ
भारतामधील शहर
लुधियाना is located in पंजाब
लुधियाना
लुधियाना
लुधियानाचे पंजाबमधील स्थान

गुणक: 30°54′36″N 75°51′00″E / 30.91000°N 75.85000°E / 30.91000; 75.85000

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा लुधियाना जिल्हा
क्षेत्रफळ ३१० चौ. किमी (१२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८६० फूट (२६० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,१८,८७९
  - घनता ९,७५२ /चौ. किमी (२५,२६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


लुधियाना (पंजाबी: ਲੁਧਿਆਣਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लुधियाना शहर पंजाबच्या पूर्व भागात सतलज नदीच्या जुन्या काठावर राजधानी चंदिगढच्या ९८ किमी पश्चिमेस वसले आहे. लुधियाना दिल्लीच्या उत्तरेकडील भारताचे सर्वात मोठे शहर असून ते उत्तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. जागतिक बँकेनुसार २००९ व २०१३ साली वाणिज्य व व्यापारासाठी लुधियाना भारतातील सर्वोत्तम शहर होते. २०११ साली लुधियानाची लोकसंख्या १६.१९ लाख होती.

नवी दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ लुधियानामधून जातो. तसेच लुधियाना रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!