रोजा हा १९९२ चा भारतीय तमिळ भाषेचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. यात अरविंद स्वामी आणि मधु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एका खेड्यातील एका सामान्य मुलीवर आधारित आहे, जी तिच्या पतीला जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेक्यांनी अपहरण केल्यानंतर त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करते.
या चित्रपटाची निर्मिती के. बालचंदर यांनी त्यांच्या कवितालय प्रॉडक्शन अंतर्गत केली आणि जी. व्यंकटेश्वरन यांनी वितरण केले होते. चित्रपटाचे छायाचित्रण संतोष सिवन यांनी केले असून संकलन सुरेश उर्स यांनी केले आहे. १५ ऑगस्ट १९९२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या देशभक्तीपर संकल्पनेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. १८ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकनासह या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळवली. जगभरातील दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या भीतीच्या वातावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
ए.आर. रहमानने या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्याला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - तमिळसाठी फिल्मफेर पुरस्कार आणि त्याच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा 'तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार' मिळाला.
पात्र
- अरविंद ऋषी कुमारच्या भूमिकेत
- रोजा म्हणून मधुबाला
- कर्नल रायप्पा म्हणून नस्सर[१]
- अचू महाराज म्हणून जनराज
- लियाकतच्या भूमिकेत पंकज कपूर
- वसीम खानच्या भूमिकेत शिवा रिंदानी[२]
- शेनबागम म्हणून वैष्णवी[३]
- गावातील ज्येष्ठांपैकी एक म्हणून सीके सरस्वती
- रोजाच्या आईच्या भूमिकेत विजया चंद्रिका
- ऋषीची आई म्हणून सत्यप्रिया
- रोजाच्या आजीच्या भूमिकेत वत्सला राजगोपाल
- चिन्ना पोन्नूच्या भूमिकेत सुजिता
- एस. वेंकटरामन चंद्रमूर्ती, ऋषीकुमारचे प्रमुख आणि रॉ अधिकारी म्हणून
- वृत्तवाचक म्हणून निर्मला पेरियासामी
- राजू सुंदरम ("रुक्मिणी" गाण्यातील विशेष उपस्थिती)[४]
प्रदर्शन
रोजा १५ ऑगस्ट १९९२ रोजी रिलीज झाला आणि जीव्ही फिल्म्सने वितरीत केला.[५] ऑगस्ट २०१५ मध्ये, २०१५ लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉम्बे आणि दिल से सोबत, पॉलिटिक्स ॲज स्पेक्टेकल: द फिल्म्स ऑफ मणिरत्नम या पूर्वलक्षी मालिकेत प्रदर्शित करण्यात आला.[६] चित्रपटाच्या यशामुळे, हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मराठी आणि मल्याळम भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला.[७]
पुरस्कार
१९९३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (भारत)[८]
- जिंकले - रौप्य कमळ पुरस्कार - सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - ए.आर. रहमान
- जिंकले - रौप्य कमळ पुरस्कार - सर्वोत्कृष्ट गीतकार - वैरामुथु
- जिंकले - राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार
अभिनेत्री मधुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकित केल्या गेले, पण अखेरीस तिला डिंपल कपाडियाकडून पराभव पत्करावा लागला.[९]
१९९३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण[१०][११]
- जिंकले - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (तमिळ) - रोजा
- जिंकले - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार (तमिळ) - एआर रहमान
१९९३ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार (भारत)[१३]
- जिंकले - सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
- जिंकले - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार - मणिरत्नम
- जिंकले - सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार - ए.आर. रहमान
- जिंकले - तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विशेष पुरस्कार - मधु
- जिंकले - सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार - मिनमिनी
१९९३ शांताराम पुरस्कार
- जिंकले - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मणिरत्नम
1993 मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (रशिया)[१४]
- नामांकित - गोल्डन सेंट जॉर्ज (सर्वोत्कृष्ट चित्रपट) - मणिरत्नम
बाईट द मँगो फिल्म फेस्टिव्हल (इंग्लंड)[१५]
- वैशिष्ट्यीकृत स्क्रीनिंग आणि प्रीमियर - रोजा
वांगफुजिंग फिल्म फेस्टिव्हल (बीजिंग)[१६]
भारतीय चित्रपट सप्ताह (मॉस्को)[१७]
- "क्लासिक ते समकालीन" या श्रेणीतील स्क्रीनिंग - रोजा
संदर्भ
बाह्य दुवे