मशाल हा १९८४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले ह्या प्रसिद्ध मराठी नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.