Share to: share facebook share twitter share wa share telegram print page

भांगसर

भांगसर म्हणजेच थाळा. हे वाद्य नाशिक जिल्ह्यातील कोकणा (कोकणा समाज/कोकणा जमात) आणि वारली समाजातील पुरुष वाजवितात. गावदेवीच्या पूजेसाठी तसेच मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना हे वाद्य वाजविले जाते. सरपट नावाच्या झाडाच्या काठीच्या टोकाला एक खास प्रकारचे कोथीचे (?) मेण लावून ही काठी पितळी थाळीच्या पृष्ठभागावर चिकटवतात. उभ्या काठीवर हाताने विशिष्ट प्रकारे घर्षण करून थाळीवर कंपने निर्माण करत त्याच्या लयींवर आदिवासी गाणे म्हणतात. याच तालावर ते कथाही सांगतात.[]

  1. ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=yllaoRTSqvO1nCYYIFvMYbYkhCnMTWVcSx4gX03APVdVcmhDH7y4cw==[permanent dead link] ची कॅश आहे. 22 Oct 2009 01:07:02 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
Prefix: a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9

Portal di Ensiklopedia Dunia

Kembali kehalaman sebelumnya