बेस ॲलिस मे हीथ (२० ऑगस्ट २००१) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर, नॉर्दर्न डायमंड्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी डर्बीशायर, तसेच महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये यॉर्कशायर डायमंड्स आणि महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळली होती.[१][२]
तिने सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.