हा लेख महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरूप याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय.
महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) हा महिला क्रिकेटचा मर्यादित षटकांचा प्रकार आहे. सामने पुरुषांच्या खेळाप्रमाणे ५० षटकांचे आहेत. पहिला महिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला गेला, जो पहिल्या महिला विश्वचषकाचा भाग म्हणून जो इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांनी आंतरराष्ट्रीय एकादश संघाचा पराभव केला. १,००० महिला एकदिवसीय सामना १३ ऑक्टोबर २०१६ रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड यांच्यात झाला.[१]
महिलांचा एकदिवसीय दर्जा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे निर्धारित केला जातो आणि तो आयसीसीच्या पूर्ण सदस्यांसाठी मर्यादित होता. मे २०२२ मध्ये, आयसीसी ने आणखी पाच संघांना एकदिवसीयचा दर्जा दिला.[२]