बेलाव्हिया बेलारुशियन एरलाइन्स (बेलारूशियन: Белавія; रशियन: Белавиа) ही बेलारूस देशाची ध्वजवाहक व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. बेलाव्हियाचे मुख्य कार्यालय मिन्स्क शहरात आहे.[१] यांची कायदेशीर संयुक्त स्टॉक कंपनी आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये १०१७ कर्मचारी आहेत.
इतिहास
सन ७ नोवेंबर १९३३ रोजी प्रथम बेलारशियन एर टेर्मिनल, मिंस्क या शहरात उघडले. पुढील वसंत ऋतु मध्ये, थ्री पीओ-2 एरक्राफ्ट हे मिंस्क शहरात लँड झाले. हे एरक्राफ्ट बेलारशियन एर फ्लीट यांचे पहिले एरक्राफ्ट झाले. सन १९३६ मध्ये, मिन्स्क आणि मॉस्को दरम्यान पहिला नियमित हवा मार्गाची स्थापना करण्यात आली. सन १९४० च्या उन्हाळ्यात बेलारूसी नागरी विमान वाहतूक गट अधिकृतपणे स्थापना केली होती.[२]
ठिकाणे
मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ येथून आशिया, युरोप आणि आफ्रिका ह्या खंडांमध्ये बेलाव्हिया विमानसेवा पुरवते. याशिवाय चार्टर फ्लाइट्स ते लीझर ठिकाणे आणि व्हीआयपी चार्टरस यांना बेलाव्हिया संचालन करत असे.[३]
फेब्रुवारी २०१६ पर्यंत : बेलाव्हिया एरलाइन्सचे खालील गंतव्ये सेवा[४] :
एशिया
सेंट्रल एशिया : कझाख्स्तान, तुर्क्मेणिस्तान
वेस्टर्न एशिया : आजारबईजन, सीपृस, जॅर्जिया, इराण, इस्राइल, लेबनॉन, टर्की