बाद-फेरी असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामधील पराभूत खेळाडू अथवा संघ स्पर्धेच्या बाहेर पडतो किंवा स्पर्धेमधून बाद होतो. ह्याउलट साखळी-सामने स्पर्धा ह्या प्रकारामध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्वनियोजित संख्येचे सामने खेळण्याची संधी मिळते. टेनिस ह्या खेळामधील बहुसंख्य स्पर्धा बाद-फेरी प्रकाराच्या आहेत.
टेनिस
ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रकारात १२८ खेळाडू भाग घेतात व प्रत्येक फेरीमध्ये निम्मे खेळाडू बाद होतात व उर्वरित पुढील फेरीमध्ये जातात.
- पहिली फेरी - १२८ खेळाडू
- दुसरी फेरी - ६४ खेळाडू
- तिसरी फेरी - ३२ खेळाडू
- चौथी फेरी - १६ खेळाडू
- उपांत्यपूर्व फेरी - ८ खेळाडू
- उपांत्य फेरी - ४ खेळाडू
- अंतिम फेरी - २ खेळाडू
उदा. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील महिला एकेरीच्या अंतिम तीन फेऱ्या.
फुटबॉल
फुटबॉल खेळामध्ये साखळी व बाद ह्या दोन्ही प्रकारांचा वापर केला जातो. फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो इत्यादी स्पर्धांमध्ये सुरुवातीस साखळी सामने खेळवून बाद फेरीसाठी संघांची निवड केली जाते. त्यापुढील स्पर्धा बाद फेरीची असून पराभूत संघ स्पर्धेबाहेर फेकला जातो.
उदा. २०१० फिफा विश्वचषकामध्ये १६ संघ बाद फेरीमध्ये पोचले.
क्रिकेट
क्रिकेट खेळामधील बहुसंख्य स्पर्धांमध्ये साखळी व बाद अशा दोन्ही फेरींचा वापर करण्यात येतो.
कबड्डी
संदर्भ
बाह्य दुवे