प्रभावतीगुप्ता (उ. 5०)) ही वाकाटक घराण्याची राणी व कारभारी होती. ती दुसऱ्या रुद्रसेनची बायको होती, आणि तिचे मुलं, दिवाकरसेन, दामोदरसेनआणि प्रवरसेन अल्पवयीन असतांना इ.स. ३८५ पासून इ.स. ४०५ पर्यंत राणी म्हणून राज्याचे कारभार सांभाळले.
तिचे वडील गुप्त साम्राज्याचे दुसरे चंद्रगुप्त होते आणि आई कुबेरानागा होती. तिने वाकाटक घराण्याच्या द्वितीय रुद्रसेनाशी लग्न केले. इ.स.३८५ मध्ये रुद्रसेनच्या मृत्यूनंतर, तिने आपल्या अल्पवयीन असलेले मुले : दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरासेन यांच्या नावावर राणी म्हणून वीस वर्षे राज्य केले. यामध्ये तिला तिच्या वडिलांनी पाठिंबा दर्शविला आणि वाकाटक राज्य प्रत्यक्ष व्यवहारात गुप्त साम्राज्याचा भाग होते. या काळास बऱ्याचदा वाकाटक-गुप्त काळ म्हणून संबोधले जाते. [१] [२]
संदर्भ