יחסי הודו–מזרח טימור (he); পূর্ব তিমুর–ভারত সম্পর্ক (bn); Indisch-osttimoresische Beziehungen (de); 東帝汶-印度關係 (zh); caidreamh idir Tíomór Thoir agus an India (ga); पूर्व तिमोर-भारत संबंध (mr); rełasion intrà Tìmor Est e Ìndia (vec); East Timor–India relations (en) diplomatic relations between East Timor and the Republic of India (en); Verhältnis zwischen Indien und Osttimor (de); diplomatic relations between East Timor and the Republic of India (en); יחסי חוץ (he); bilateral relations (en-us); білатеральні відносини (uk) India–East Timor relations, East Timor-India relations, India-East Timor relations (en)
पूर्व तिमोर-भारत संबंध हे ओशनिया मधील देश पूर्व तिमोर आणि आशिया मधील देश भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. जकार्ता, इंडोनेशिया येथील भारतीय दूतावास हे पूर्व तिमोरला पण एकाच वेळी मान्यताप्राप्त आहे.[१] पूर्व तिमोरचे भारतात कोणतेही राजनैतिक प्रतिनिधित्व नाही. ७ सप्टेंबर २०२३ रोजी भारताने दिली (पूर्व तिमोरची राजधानी) येथे दूतावास उघडण्याची घोषणा केली.[२]
इतिहास
पूर्व तिमोर आणि भारत यांच्यातील संबंध सुरुवातीच्या आधुनिक काळातील स्थापन झाले आहेत. भारतीय व्यापारी चंदनाच्या शोधात पूर्व तिमोर बेटावर गेले.[३] पूर्व तिमोर आणि भारताच्या काही भागांवर पोर्तुगीज वसाहत झाल्यानंतर व्यापारी संबंध वाढले.[४] हा व्यापार करण्यासाठी पोर्तुगीजांनी भारतात विविध चौकी केंद्रे स्थापन केली आणि आशियातील पोर्तुगालचे सर्व प्रदेश - पूर्व तिमोरसह - गोव्यातील पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या शासनाखाली होते. पोर्तुगीज-प्रशिक्षित गोवन मिशनरी १७ व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्व तिमोरमध्ये आले, आणि देशात कॅथलिक धर्माचा प्रसार करण्याचे कार्य सुरू झाले.[५] भारतीयांनी पूर्व तिमोरला प्रवास केला आनी तिथे ते सैनिक, वसाहतवादी नोकरशहा आणि मिशनरी म्हणून काम करू लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थलांतरित कामगार म्हणून काम करण्यासाठी काही भारतीय पूर्व तिमोरमध्ये आले.[६]
पूर्व तिमोरच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा भारत हा दुसरा देश होता.[६] परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, ओमर अब्दुल्ला यांनी मे २००२ मध्ये पूर्व तिमोरच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.[७] अब्दुल्ला यांनी भारताचे राष्ट्रपती के.आर. नारायणन व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून सत्काराची पत्रे सादर केली. २४ जानेवारी २००३ रोजी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध औपचारिकपणे स्थापित झाले. २००३ मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये, पूर्व तिमोरचे पंतप्रधान मारी अल्कातिरी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या उमेदवारीला आपल्या देशाचा पाठिंबा आहे असे जाहीर केले.[८]
पूर्व तिमोर आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०१५-१६ मध्ये एकूण US$३.४५ दशलक्ष होता.[९] त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३% ने घट झाली होती. भारताने पूर्व तिमोरला $३.४२ दशलक्ष किमतीचा माल निर्यात केला आणि $३०,००० चा माल आयात केला. भारताकडून पूर्व तिमोरला निर्यात केल्या जाणाऱ्या मुख्य वस्तू म्हणजे औषधी, प्लास्टिक आणि इलेक्ट्रिकल मशिनरी आहे. भारताकडून आयात केलेली प्रमुख वस्तू ही रासायनिक उत्पादने आहेत.[८]
काही भारतीय कंपन्यांनी पूर्व तिमोरच्या तेल आणि वायू उद्योगात गुंतवणूक केली आहे. ते पूर्व तिमोरच्या किनाऱ्यावर तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधात सक्रिय आहेत.[१०] रिलायन्स पेट्रोलियमला २००६ मध्ये पूर्व तिमोरच्या किनाऱ्याजवळ दोन ब्लॉक्समध्ये तेल शोधण्याचे अधिकार देण्यात आले.[६] रिलायन्स पेट्रोलियमने २०१० च्या उत्तरार्धात तिमोर समुद्रात नैसर्गिक वायूचा शोध सुरू केला.[११] २००६ मध्ये टाटा मोटर्सने तिमोर पोलिस आणि इतर सरकारी एजन्सींच्या वापरासाठी ४०० वाहने पुरवली होती.[६]
संदर्भ
|
---|
द्विपक्षीय संबंध |
---|
आफ्रिका | |
---|
अमेरिका | |
---|
आशिया | |
---|
युरोप | |
---|
ओशनिया | |
---|
माजी संबंध | |
---|
|
|
|
|