नीरो

नीरो
रोमन साम्राज्याचा ५ वा सम्राट
रोममधील कॅपिटोलिनी संग्रहालयातील नीरोचा अर्धपुतळा
अधिकारकाळ १३ ऑक्टोबर, इ.स. ५४ ते ९ जून, इ.स. ६८
पूर्ण नाव नीरो क्लॉडिअस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस
जन्म १५ डिसेंबर, इ.स. ३७
रोमच्या बाहेर
मृत्यू ९ जून, इ.स. ६८
रोम
पूर्वाधिकारी क्लॉडिअस
उत्तराधिकारी गॅल्बा

नीरो (पूर्ण नाव - नीरो क्लॉडिअस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस लॅटिन : Nero Claudius Caesar Augustus Germanicus जन्म - १५ डिसेंबर, इ.स. ३७ मृत्यू - ९ जून, इ.स. ६८ रोम) हा रोमन साम्राज्याचा पाचवा सम्राट होता.

इतिहास

क्लॉडियस याने ॲग्रिप्पिना हिच्याशी विवाह करून तिला राणी बनवले होते. ॲग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी होती. आपल्या पहिल्या दोन बायकांना क्लॉडियसने सोडचिठ्ठी दिली होती तर तिसऱ्या बायकोला ठार केले होते. नीरो हा ॲग्रिप्पिना हिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा होता. ॲग्रिप्पिनाने क्लॉडियसशी लग्न करून ती रोमची राणी झाली तेव्हा नीरो अकरा वर्षांचा होता. पुढे ॲग्रिप्पिनाने क्लॉडिअसलाच विषप्रयोग करून ठार केले तेव्हा नीरो सतरा वर्षांचा होता.

क्लॉडियस ठार झाला त्यावेळी त्याला ब्रिटॅन्निकस नामक पहिल्या पत्नीपासून झालेला एक मुलगा असल्याने नीरो कायदेशीररित्या त्याच्या गादीचा वारस होऊ शकत नव्हता. गादीचा वारस कोणाला करायचे हे त्यावेळी रोमन साम्राज्यात बादशाही गार्डांच्या हातात असे. ते वाटेल त्याची निवड करत असत व सीनेटरांनाही त्याला मान्यता द्यावी लागे. नीरो हाच गादीचा व रोमन साम्राज्याचा सम्राट व्हावा म्हणून ॲग्रिप्पिना त्याला घेऊन बादशाही गार्डांकडे गेली व ब्रिटॅन्निकसपेक्षा नीरो हाच कसा गादीचा वारस होण्यास अधिक योग्य आहे ते तिने बादशाही गार्डांना पटवून दिले त्यामुळे नीरोच्याच नावाची रोमचा सम्राट म्हणून घोषणा करण्यात आली.

इतर

रोमन साम्राज्यात समलिंगी विवाह होत असत.[][] नीरो या रोमन सम्राटाने त्याच्या एका नोकराबरोबर असा विवाह केल्याचे म्हणले जाते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ स्कॅरी, ख्रिस. "क्रॉनिकल्स ऑफ द रोमन एम्पेरर्स" (लंडन: थेम्स अँड हडसन लिमिटेड, १९९५). पृष्ठ १५१.
  2. ^ a b बॉस्वेल, जॉन. "सेम सेक्स युनियन्स इन प्रीमॉडर्न युरोप." (न्यू यॉर्क: रॅंडम हाऊस, १९९५). पृष्ठे ८०–८५.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!