ॲंटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६ – ७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.
पार्श्वभूमी
हेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी ॲंटोनियस पायस याला आपला वारस निवडले. ॲंटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-ॲंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.
संदर्भ आणि नोंदी