रोमन सम्राट फ्लाव्हियस ज्युलियस कॉन्स्टान्स(इ.स. ३२०-जानेवारी १८, इ.स. ३५०) याने रोमन साम्राज्यावर इ.स. ३३७ ते इ.स. ३५० पर्यंत राज्य केले. त्याने दोन वडील भावांबरोबर (कॉन्स्टॅन्टियस दुसरा आणि कॉन्स्टन्टाईन दुसरा) एकत्र राज्य केले.
कॉन्स्टान्स हा कॉन्स्टन्टाईन पहिला व त्याची दुसरी राणी फौस्टाचा मुलगा होता. इ.स. ३४० मध्ये कॉन्स्टन्टाईन दुसऱ्याने कॉन्स्टान्सच्या सैन्यावर हल्ला केला परंतु कॉन्स्टान्स त्या लढाईत विजयी झाला.
इ.स. ३५० मध्ये रोमन सेनापती मॅग्नॅन्टीयसने कॉन्स्टान्सला पदच्युत केले व स्वतःला सम्राट घोषित केले. कॉन्स्टान्स गॉलमध्ये पळून गेला. मॅग्नॅन्टीयसच्या समर्थकांनी तेथे त्याला एका किल्ल्यात घेरले व ठार केले.