गुणक: 40°50′N 14°15′E / 40.833°N 14.250°E / 40.833; 14.250
नापोली किंवा नेपल्स ही इटली देशाच्या काम्पानिया प्रदेशाची राजधानी व इटलीमधील एक महत्त्वाचे शहर आहे. सुमारे २,८०० वर्षे जुने असलेले नापोली हे शहर प्राचीन काळापासून संस्कृती, वास्तुशास्त्र, कला, संगीत ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. पिझ्झा ह्या जगप्रसिद्ध इटालियन खाद्यपदार्थाचा उगम ह्याच शहरात झाला.