नालायिर दिव्य प्रबंधम (इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळ: நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் )दिव्य प्रबंधम किंवा नालायिर (चार सहस्र)दिव्य प्रबंधम् ह्या भगवान विष्णूंच्यास्तुतीवर आधारलेल्या ओव्यांचा तमिळ भाषेतील काव्यसंग्रह आहे. हा मुळात, तत्कालीन वैष्णव तमिळ संत आळ्वार ह्यांनी रचला होता. दिव्य प्रबंधम् ही तमिळ साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट कलाकृती मानण्यात येते. ह्या रचनांचा संदर्भ "दिव्य देशम्" शी निगडित आहे. जिथे दिव्य संत आळ्वार भगवान विष्णूंची आराधना करत असत त्या स्थानांना दिव्य देशम म्हणतात. संत आळ्वार यांनी परमेश्वराच्या स्तुतिप्रीत्यर्थ गायलेल्या आणि रचलेल्या काव्यांना "नालायिर दिव्य प्रबंधम्" असे म्हणतात. दिव्य प्रबंधम् हे एका अर्थाने परमेश्वराच्या सौंदर्यांचे, सामर्थ्याचे आणि ऐश्वर्याचे वर्णनच आहे. हे वर्णन १०८ ठिकाणी स्थापन झालेल्या विष्णूंच्या विग्रहास(?) उद्देशून लिहिले गेले आहेत. वेदांचा, उपनिषदांचा तसेच व्यासांच्या ब्रह्मसूत्रांचा आशय सांगणारे ते साध्या-सोप्या तमिळ भाषेतील काव्य आहे. तमिळ साहित्याचा शिरोमणी मानल्या गेलेल्या ह्या रचनांना, संत नाथमुनी ह्यांनी १०व्या शतकात नवसंजीवनी दिली व त्यांची एकत्रितपणे पुनःरचना करून त्या जगासमोर मांडल्या.
नालायिर प्रबंधमांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.:
मुदल आयिरम् किंवा प्रथम सहस्र काव्य जे ९४७ ओव्यांचे आहे ;
पेरियाळ्वार रचित पेरियाळ्वार तिरुमोळि (४७३ ओव्या), ज्यात प्रसिद्ध तिरु पल्लांडु (पल्लांड्)चा समावेश आहे.
अंडाळ् रचित तिरुप्पावै (३० ओव्या)
...
हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय |
---|
नाथ संप्रदाय | |
---|
वारकरी संत | |
---|
मराठी संत | |
---|
समर्थ संप्रदाय | |
---|
लिंगायत संप्रदाय | |
---|
महानुभाव पंथ | |
---|
तमिळ संत | |
---|
दत्त संप्रदाय | |
---|
आधुनिक संत | |
---|