एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पुजा होते. तसेच या दर्यामध्ये एक ३ ते ४ मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे. या झ्ऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहाण्याजोगा असतो. तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे.
फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमील) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रयेकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.
अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृद्धेश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था, सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी सदोदीत वाट पाहत आहे.
(३.३.२०१७)काल* श्री क्षेत्र मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजिवणी समाधीला तेल लावणे हा पारंपारिक विधी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला.तत्पुर्वी दुपारी ४ वाजता ग्रामस्थांच्या व नाथभक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात आला.व नंतर शंख व नगारा वाद्याच्या गजरात श्री कानिफनाथ महाराज कि जय म्हणत पारंपारिक पद्धतीत नाथांना तेल लावण्यात आले. याञेपूर्वीचा हा महत्त्वाचा विधी मानला जातो.*
तेल लागल्या नंतर गुढीपाडव्या पर्यंत मढी व निवडुंगे या गावामधे विविध व्रतबंधने पाळली जातात. यात शेतीची कामे, विवाह/वास्तुशांती ई.मंगलकार्ये, गादी व पलंगावर शयन करणे, दाढी/हजामत करणे,नवीन कामास प्रारंभ, तसेच घरामधे पदार्थ तळणे ई. कामे वर्ज्य केली जातात.ही खुप वर्षाची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थांनी एकञ येवुन याञेची तयारी करावी ही त्यामागची भावना आहे.
नाथसंप्रदयाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणुन श्री क्षेत्र मढी येथील याञा राज्यात प्रसिद्ध आहे. या याञेत अठरापगड जातीधर्माच्या समाजाला मान दिला जातो.
होळी ते गुढीपाडवा अशी १५ दिवस ही भव्य याञा असते.
॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥
कानिफनाथ महाराज हे [नवनाथ] महाराजां पैकी एक आहेत. श्री क्षेत्र [मढी], जिल्हा अहमदनगर येथे त्यांची समाधी आहे. त्यांच्या शिष्य वर्गात [आवजीनाथ महाराज|आवजीनाथ महाराजांचा] समावेश आहे .Written By Sandip Sapkal Bhadgaon
9595343170
बाह्य दुवे