| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गुलाब रघुनाथराव पाटील (गुर्जर), गुलाब भाऊ म्हणून प्रसिद्ध, (५ जून, १९६६:जळगाव, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागाचे विद्यमान मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२] हे भाजपा पक्षातर्फे एरंडोल मतदारसंघातून १०व्या आणि ११व्या[३][४] तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १३व्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जलपुरवठा आणि निःसारणमंत्री होते. या आधी ते २०१६-१९ दरम्यान देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहकारमंत्री होते.[५]
गुलाबराव रघुनाथराव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत सर्वसामान्यांचे लोकनेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. कोणताही राजकीय वासरा नसतांना केवळ संघटन कौशल्य व वकृत्वशैलीमुळे त्यांनी जनमानसात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचे मूळ गाव लाडली ता. धरणगाव, जिल्हा जळगाव असून त्यांचं जन्म गाव व हल्ली राहत असलेले गाव पाळधी ता. धरणगाव, जिल्हा जळगाव आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाळधी गावात तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव शहरात झाले आहे.
त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा उघडली. शाखा प्रमुख म्हणून ते स्वतःच होते. १९९१ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाळीसगांव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश राणा यांनी गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी दिली. व तेथे त्यांचे भाषण खुपच प्रभावी झाले. व तेथूनच त्यांचा खरा राजकिय प्रवास सुरू झाला.
१९९२ मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. याच काळात धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून त्यांची निवड झाली. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. १९९७ मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद जळगांवच्या कृषी समितीच्या सभापती पदावर निवड झाली. १९९७ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या म्हाडाच्या समितीवर सदस्यपदावर निवड झाली.
१९९९ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या पक्षावर एरंडोल विधानसभा मतदार संघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्याच पंचवार्षिक मध्ये भाऊ शिवसेनेचे नाशिक विभागाचे प्रतोद होते. १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. २०१० मध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आज पर्यंत ते उपनेते म्हणून कार्यरत आहेत.
२०१४ च्या पंचवार्षिक निवडणूकीत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. जुलै २०१६ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. २९ डिसेंबर २०१६ रोजी परभणी जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. २४ आक्टोंबर २०१९ रोजी जळगाव ग्रामीण मधुन ४६७३३ मतांनी ४ वेळा विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले. ३० डिसेंबर २०१९ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणुन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र पदाची शपथ घेतली.
०८ जानेवारी २०२० रोजी गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून दुसऱ्यांदा पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र पदाची शपथ घेतली.[६] २८ सप्टेबर २०२२ रोजी जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली.
पदे भूषवली
- १९९१ पाळधी शिवसेना शाखा प्रमुख
- १९९२ एरंडोल पंचायत समिती सदस्य
- १९९२ धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
- १९९५ ते १९९९ या कालावधीत शिवसेना जिल्हा प्रमुख
- १९९७ जळगाव जिल्हा परिषद सदस्य, जि.प.सभापती
- १९९७ महाराष्ट्र राज्य म्हाडा समिती सदस्य
- १९९९ एरंडोल विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्य
- १९९९ शिवसेनेचे नाशिक विभागाचे प्रतोद
- १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिकमध्ये विधानसभेचे आमदार
- २०१० पासून आजतयागत शिवसेना पक्षाचे उपनेते
- २०१४ च्या पंचवार्षिक निवडणूकीत तिसऱ्यांदा आमदार
- जुलै २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून वर्णी
- २९ डिसेंबर २०१६ रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती
- २०१९ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी
- ३० डिसेंबर २०१९ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र पदाची शपथ
- ०८ जानेवारी २०२० रोजी जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती
- ०९ ऑगस्ट २०२२ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र पदाची शपथ
- २८ सप्टेबर २०२२ रोजी जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती
संदर्भ