या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.
मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असामी’, मधुकर टिल्लू यांचा 'प्रसंग लहान, विनोद महान' किंवा 'हसायदान',' जिंदादिल - मराठी शेरोशायरी', सुमन धर्माधिकारी यांची ‘घार हिंडते आकाशी’, वि. र. गोडे यांचे ‘अंतरीच्या नाना कळा’ तसेच सदानंद जोशी यांचे ‘मी अत्रे बोलतोय...’ याची दर्जेदार परंपरा लाभली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, राम नगरकर यांचे ‘रामनगरी’, लालन सारंग यांचे ‘मी आणि माझ्या भूमिका’, शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’, सुषमा देशपांडे यांची ‘व्हय मी सावित्रीबाई’, वसंत पोतदार यांचे ‘योद्धा सन्यासी’, सदानंद चांदेकर ' हसरी उठाठेव ' यांनीही एकपात्रीच्या दालनात वैभव निर्माण केले.सदानंद चांदेकर यांनी देश विदेशात शेकडो एकपात्री प्रयोग केले. त्यांचा इंग्लिश पिक्चरचा ट्रेलर या सादरीकरणाला हमखास वन्समोअर मिळत असे..नवीन एकपात्री कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या चांदेकर सरांचे " आम्ही दिवटे " हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध आहे.
दिलीप प्रभावळकर या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’, या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. विश्वास मेहेंदळे, मकरंद टिल्लू, रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे,व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ,बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे , राहुल भालेराव असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.
एक सलग कथा नसतानाही आयुष्यातील विनोदी प्रसंगाची गुंफण करून एकपात्री सादर करण्याच्या पद्धतीचे स्व. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान:१९६१) हे जनक आहेत. राशी, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव यांचे ‘वास्तुविराज’, विवेक मेहेत्रे याचे ‘राशीवर्ष’ यांनीही हाऊसफुल्ल प्रयोगांचे विक्रम रंगभूमीवर केले आहेत. एकूणच एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय, आशय आहेत. त्यात संवाद, गप्पागोष्टी, किस्से,काव्य, मार्गदर्शन, नाट्य हे आहे.राहुल विनायक भालेराव यांनी १९९५ ते २००२ या कालावधीत ११ राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धांचे विजेतेपद मिळवले .स्वानुभवावर आधारीत
" श्री हसोबा प्रसन्न " या एकपात्रीचे १५०हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत .
दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणाऱ्या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.
२००१ साली स्व. मधुकर टिल्लू यांच्या स्मृती निमित्त पुण्यात एकपात्री कलाकार एकत्र आले व त्यातून एकपात्री कलाकार संघ स्थापन झाला. नंतर त्यातूनच ' एकपात्री कलाकार परिषदेची' स्थापना झाली. २००६साली एकपात्री कलाकार परिषदेच्या मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. 'एकपात्री कलाकार परिषद' संस्थेचे २००७ सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.एकपात्री कलाकार परिषद संस्थे तर्फे पन्नासहून अधिक एकपात्री महोत्सव सादर झाले आहेत . त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार' संघटना स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली होती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्घाटन करण्यात आले.
वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. बंडा जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, मकरंद टिल्लू यांचा'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम ! टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या इ.स. १९६१ पासून एकपात्री सादर करीत आहेत. स्व.मधुकर टिल्लू , मुलगा मकरंद टिल्लू व नात हर्षदा टिल्लू गेली ५७ वर्षे एकपात्री करत आहेत. ही रंगभूमीवर प्रथमच घडणारी घटना आहे.[१][मृत दुवा]
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांची निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्जमध्ये नोंद झाली आहे.
मराठीत यांशिवायही सुषमा देशपांडेसारख्या अनेक कलावंतांनी एकपात्री नाटक किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
सचिन देवरे (पाचोरा )यांच्या हसू आणि आसू या एक नंबर एकपात्री देखील महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे
गाजलेले एकपात्री
अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
मंजिरी धामणकर (चर्पटमंजिरी) (मराठी-हिंदी) (मंजिरी धामणकर यांचे स्वानुभवांवर आधारलेले ’अनुनाद’ हे पुस्तक आणि ऑडियो सीडी निघाली आहे. या पुस्तकाला २०१४ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार मिळाला. याशिवाय मंजिरी धामणकर यांना २०१७ सालचा मालतीदेवी पटवर्धन पुरस्कारही मिळाला आहे.)
मंदार गायधनी (कोपरखळी)
मधुकर काकडे (मंत्र सुखाचा)
कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
डॉ. मधुसूदन घाणेकर (सबकुछ मधुसूदन -मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-सुमारे १२०००प्रयोग); अश्या बायका तश्या बायका, ५००वा प्रयोग १०-३-२०१३ला)
मनीष आपटे (गुगुल्या)
प्रा. महेंद्र गणपुले ( हास्यनगरी)
मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
मृण्मयी भजग
मृदुला मोघे (हास्यषट्कार)
मेघना झुजम (मी सावित्रीबाई बोलतेय)
डॉ. मेधा खाजगीवाले (आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन)