या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
मकरंद टिल्लू हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ या नावाने ताणताणावाच्या जीवनात आवश्यक अशा विचारसरणीचा कार्यक्रम सादर करतात. तीन पिढ्यांना एकत्र घेऊन ‘हास्यपंचमी ते हास्यपासष्ठी’ असा कार्यक्रम ते सादर करीत. टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या ६३ हुन अधिक वर्षे एकपात्री करतात.[ संदर्भ हवा ]
टिल्लू यांनी दूरदर्शन, ई टीव्ही, आकाशवाणी यावर कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ४००० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. एकपात्री कलाकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते संयुक्त कार्यवाह होते.[ संदर्भ हवा ] याच सोबत त्यांनी विविध व्याख्यानमालात, कॉलेजमध्ये सुमारे १०००हून व्याख्याने दिली आहेत. ७०० हून अधिक व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतल्या आहेत. मर्सिडीज बेंज, टाटा मोटर्स, महिंद्रा, सीएट, फियाट, टेक महिंद्रा, इन्फोसिस, केपीआयटी, थरमॅक्स, सानोफी, शाफलर, ग्रोवेल, भेल, लिनामार अशा अनेक कंपन्यात कार्यशाळा घेतल्या आहेत. यशदा, पोलीस डिपार्टमेंट, आर्मी, बँक अशा अनेक ठिकाणी देखील कार्यशाळा घेतल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
एकपात्री कलाकार परिषद, लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, नवचैतन्य हास्ययोग परिवार,जलरक्षक प्रबोधिनी, हसायदान फौंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, वनराई, वसुंधरा स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक संस्थां सोबत कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
‘ मिड डे ’ या वृत्तपत्रात ‘ बजाज ऑटो मॅन ऑफ कॅलीबर ’ या अंतर्गत तसेच पुणे महापालिकेतर्फे हास्य व विनोद क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ] एकपात्री क्षेत्रात ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यबद्दल त्यांना ‘बालगंधर्व’ परिवार पुरस्कार देण्यात आला.[ संदर्भ हवा ] कलाकार व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पुणे भूषण पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार, द. मा. मिरासदार पुरस्कार, वंचित विकास संस्थेतर्फे पुरस्कार, राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पर्वती भूषण पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे ‘पुण्याचा अभिमान ’ हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच पाणी बचतीच्या क्षेत्रातील कार्यबद्दल 'सेव्ह वॉटर हिरो अवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
लाफ्टरयोगाचे शारीरिक व मानसिक फायदे याचे ते २५ वर्षे अभ्यासक व प्रचारक आहेत.[ संदर्भ हवा ] १३ लाखाहून अधिक लोकांपर्यंत त्यांनी हास्ययोगाचा प्रसार केला आहे. महाराष्ट्रात १५०० हून अधिक हास्यक्लब आहेत. या हास्यक्लब समन्वय साधणाऱ्या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र संस्थेचे ते प्रदेश अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] २१८ हास्यक्लब व पंचवीस हजाराहून अधिक सदस्यांनी लाभ घेतलेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त व मुख्य समन्वयक आहेत. जगातील सर्वात मोठा, ५००० सदस्य असलेला ऑनलाईन हास्यक्लब त्यांनी स्थापन केला आहे. ‘झी’ २४तास या वाहिनीवरून ‘हास्ययोगातून तणावमुक्ती ’ या विषयावर त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती.[ संदर्भ हवा ] हास्ययोगतज्ञ म्हणून टिल्लू यांना सॅरीटोगा स्प्रिंग, न्यू यॉर्क येथे हास्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी बोलावणे आले होते.[ संदर्भ हवा ]
जलरक्षक प्रबोधिनी
जलरक्षक प्रबोधिनीचे ते संस्थापक आहेत.[ संदर्भ हवा ] ‘एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान’ त्यांनी सुरू केले आहे. लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे १०० कोटी लिटर पाणी त्यांनी वाचवले आहे. त्यांनी सुरू केलेले ‘गळतीमुक्त नळ अभियान’ ३८ गावात सुरू झाले आहे.[ संदर्भ हवा ]
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}})(कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!