वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी आयव्हन सत्तेवर आला, परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पहात होते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.