आय छिंग (देवनागरी लेखनभेद: आय च्हिंग, आय त्सिंग ; पारंपरिक चिनी लिपी: 艾青; पिन्यिन: Aì Qīng;) या टोपणनावाने विख्यात असलेला ज्यांग चंघान (सोपी चिनी लिपी: 蒋正涵 ; पिन्यिन: Jiang Zhenghan ;) (मार्च २७, इ.स. १९१० - मे ५, इ.स. १९९६) हा चिनी भाषेतील आधुनिक कवींपैकी एक होता. त्याने लिंग बी (चिनी लिपी: 林壁 ), क आ (चिनी लिपी: 克阿 ), अ ज्या (चिनी लिपी: 莪伽 ) या टोपणनावांनीही साहित्यनिर्मिती केली.