अल ऐन (अरबी: العين) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील चौथ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबई, अबु धाबी व शारजा खालोखाल) आहे. अल ऐन शहर अबु धाबी अमिरातीमध्ये अबु धाबी शहराच्या १६० किमी पूर्वेस तर दुबईच्या १२० किमी दक्षिणेस ओमान देशाच्या सीमेजवळ वसले आहे. अल ऐन हे संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान ह्याचे जन्मस्थान आहे.
येथील ऐतिहासिक स्थानांसाठी अल ऐन युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
बाह्य दुवे