अनुप्रिया पटेल (जन्म: २९ एप्रिल १९८१) ह्या एक भारतीय राजकारणी, विद्यमान केंद्रीय मंत्री व अपना दल (सोनेलाल) ह्या प्रादेशिक पक्षाच्या पक्षाध्यक्षा आहेत. २०१२ ते २०१४ दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य राहिल्यानंतर पटेल २०१४ पासून लोकसभेवर निवडून येत आहेत. आजच्या घडीला त्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री आहेत.