अखिलेश यादव

अखिलेश यादव

कार्यकाळ
१५ मार्च २०१२ – ११ मार्च २०१७
मागील मायावती
पुढील योगी आदित्यनाथ

लोकसभा खासदार
कार्यकाळ
२००० – २ मे २०१२
मतदारसंघ कन्नौज

जन्म १ जुलै, १९७३ (1973-07-01) (वय: ५१)
इटावा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
पत्नी डिंपल यादव
नाते मुलायम सिंग यादव (वडील)
अपत्ये

अखिलेश यादव (जन्म : सैफई-इटावा जिल्हा, १ जुलै १९७३) हा भारतातील एक राजकारणी, समाजवादी पक्षाचा पक्षप्रमुख व उत्तर प्रदेश राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१७ दरम्यान ह्या पदावर असणारा अखिलेश हा उत्तर प्रदेशचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव ह्यांचा मुलगा असलेला अखिलेश २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर आला. ५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत अखिलेश व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

शिक्षण

अखिलेशने म्हैसूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केले आहे. शिवाय त्याने सिेडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे.

राजकीय कारकीर्द

सन २०००मध्ये अखिलेश यादव कनोज मतदारसंघातून पहिल्यांदा (१३व्या) लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार झाला. त्यानंतर पुढे लागोपाठ दोनवेळा त्याने कनोजमधून निवडणूक जिंकली. खासदारकीच्या पहिल्या कारकीर्दीत अखिलेश

  • नागरी पुरवठा, अन्नधान्य सार्वजनिक वितरण या समितीचा सदस्य होता.
  • तो सन २००० ते २००१ या काळात लोकसभेच्या नीतिशास्त्र (एथिक्स) समितीमध्ये होता.
  • २००२ ते २००४ पर्यावरण व वन समिती आणि विज्ञान व उद्योग समिती यांचा सदस्य
  • २००४ साली १४व्या लोकसभेवर निवड
  • २००९मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडला गेला.
  • १० मार्च २०१२ला उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचा नेता म्हणून निवड
  • १५ मार्च २०१२ रोजी वयाच्या ३७व्या वर्षी उत्तर प्रदेश राज्याचा, सर्वात लहान वयाचा मुख्यमंत्री.
  • २ मे २०१२ रोजी विधानसभेतून निवडून येण्यासाठी १५व्या लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

कौटुंबिक माहिती

अखिलेश यादव याने २४ नोव्हेंबर १९९९ या दिवशी लग्न केले, पत्नीचे नाव डिंपल यादव. त्यांना अदिती व टीना या दोन मुली आणि अर्जुन नावाचा मुलगा आहे.

आवड-निवड

अखिलेश यादव याला फुटबाॅल व क्रिकेट या खेळांत खूप रस असून पुस्तकवाचन, संगीत श्रवण आणि चित्रपट पाहणे हे छंद आहेत.

पुरस्कार

२०१९ सालचा 'यश भारती पुरस्कार. (उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च पुरस्कार. हा पुरस्कार साहित्य, समाजसेवा, वैद्यकी, फिल्म, विज्ञान, पत्रकारिता, हस्तशिल्प, संस्कृति, शिक्षण, संगीत, नाटक, खेळ, उद्योग किंवा ज्योतिष यापैकी एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्याला, अर्ज केल्यानंतर, दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्ति पत्र, शाल आणि ११ लाख रुपये रोख असे आहे.)

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!