मायावती ( मायावती प्रभुदास; १५ जानेवारी, इ.स. १९५६) ह्या भारतीय हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. २००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौर वेळा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
जीवन
मायावतींचा जन्म दिल्लीतील लेडी हार्डिंग (सध्याचे श्रीमती सुचेता कृपलानी) इस्पितळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभुदास आणि आईचे नाव रामरती होते. मायावती या उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर गांवाच्या मूळ निवासी आहेत. त्या बी.ए., बी.एड. व एल.एल.बी.आहेत. आपल्या कार्यदक्षता व क्षमतेच्या बळावर त्यांना ‘आयर्न लेडी’ (पोलादी स्त्री) व ‘आयकाॅनिक वुमन’ (आदर्श स्त्री) असल्याची ख्याती मिळवली. मायावती अजून अविवाहित आहेत.
संदर्भ