इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. २०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिपमधील सर्वोत्कृष्ट चार संघ आपोआप पात्र होतील, तर इतर चार स्थानांसाठी २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दहा संघ लढत देतील.
आपोआप पात्रता
२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप स्पर्धेतील आठपैकी अव्वल चार संघ २०१७ विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरतील आणि शेवटचे चार संघ २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेमध्ये खेळतील.[१]
प्रादेशिक पात्रता
आफ्रिका
आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धा २३ ते २६ एप्रिल २०१६ दरम्यान हरारे, झिम्बाब्वे येथे पार पडली. ज्यामध्ये चार संघांदरम्यान एकूण १२ टी२० सामने खेळवले गेले. स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व सहा सामन्यांमध्ये अजिंक्य राहून झिम्बाब्वेचा संघ विजेता ठरला.[२]
अमेरिका
खेळ आणि व्यवस्थापनामधील २०१३ मध्ये, आयसीसीने जाहीर केले की २०१७ विश्वचषकासाठी अमेरिकेत प्रादेशिक पात्रता स्पर्धा होणार नाहीत. खेळ आणि व्यवस्थापनामधील वाईट गुणवत्ता पाहून हा निर्णय घेण्यात आला. आयसीसी महिला चँपियनशीप मधचा सभासद असल्याने आयसीसी अमेरिकामधील फक्त वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ हा एकमेव संघ विश्वचषक पात्रता स्पर्धेत सहभागी होवू शकला.[३]
आशिया
आशिया प्रादेशिक पात्रता स्पर्धा ९-१५ ऑक्टोबर २०१६ दरम्यान हाँग काँग येथे खेळवली गेली. सामने मिशन रोड मैदान, काऊलून क्रिकेट क्लब, आणि हाँग काँग क्रिकेट क्लब ह्या ठिकाणी खेळवले गेले. स्पर्धेत चार संघांनी भाग घेतला, आणि २०-षटकांचे सामने खेळवले गेले.[४]
सामन्यांची यादी
|
वि
|
चीन३२ (१२.१ षटके)
|
|
|
|
|
वि
|
चीन७४ (१८.५ षटके)
|
|
|
|
|
वि
|
चीन७५/८ (२० षटके)
|
|
|
|
|
वि
|
चीन८७/७ (१९.२ षटके)
|
|
|
|
चीन ११४ (१९ षटके)
|
वि
|
|
|
|
|
चीन ८५/७ (२० षटके)
|
वि
|
|
|
|
|
पूर्व आशिया-पॅसिफिक
पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता स्पर्धा १५ ते २२ जुलै २०१६ दरम्यान आपिया, सामोआ येथे खेळवली गेली, ज्यामध्ये तीन संघ सहभागी झाले होते. पापुआ न्यु गिनीचा संघ विजेता ठरला. ते त्यांच्या चारही सामन्यांत अजिंक्य राहिले.[५]
सामन्यांची यादी
पापुआ न्यु गिनी ६ गडी व ९१ चेंडू राखून विजयी फालेआटा ओव्हल, आपिया
|
पापुआ न्यु गिनी ५ गडी व १५२ चेंडू राखून विजयी फालेआटा ओव्हल, आपिया
|
सामोआ २६ धावांनी विजयी फालेआटा ओव्हल, आपिया
|
पापुआ न्यु गिनी ३ गडी व ७१ चेंडू राखून विजयी फालेआटा ओव्हल, आपिया
|
जपान १०५/९ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
पापुआ न्यु गिनी ८ गडी व ५९ चेंडू राखून विजयी. (ड/ल) फालेआटा ओव्हल, आपिया
|
जपान १३५/८ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
सामोआ ३ गडी व ४२ चेंडू राखून विजयी फालेआटा ओव्हल, आपिया
|
युरोप
युरोप प्रादेशिक पात्रता स्पर्धा १२–१५ जुलै २०१६ दरम्यान साऊथएण्ड-ऑन-सी, इसेक्स, इंग्लंड, येथे पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये केवळ दोन संघ सहभागी झाले. ज्यामध्ये स्कॉटलंडने नेदरलँड्सला सर्व तिन्ही सामन्यात पराभूत केले.[५]
विश्वचषक पात्रता स्पर्धा
२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा कोलंबो, श्रीलंका येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये खेळवली जाईल.[६]
- पात्र संघ
- भारत (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
- दक्षिण आफ्रिका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
- पाकिस्तान (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
- श्रीलंका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
- बांगलादेश (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
- आयर्लंड (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
- झिम्बाब्वे (आफ्रिकी प्रादेशिक पात्रता)
- थायलंड (आशियाई प्रादेशिक पात्रता)
- पापुआ न्यू गिनी (पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता)
- स्कॉटलंड (युरोपिय प्रादेशिक पात्रता)
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आय.सी.सी. महिला विश्व चषक २०१७च्या लोगोचे अनावरण " Archived 2016-07-26 at the Wayback Machine., आयसीसी, २३ जुलै २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वे विजयी" Archived 2016-09-15 at the Wayback Machine., आयसीसी, २७ एप्रिल २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ नादिया टि. ग्रुनी, अहवाल: आयसीसी अमेरिकास महिला ॲवॉर्ड[permanent dead link], अमेरिका महिला क्रिकेट. १ जानेवारी २०१४ १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी २०१६ महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा – आशियाचे यजमानपद हाँग काँगकडे"[permanent dead link], आयसीसी, २१ जून २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "पापुआ न्यु गिनी आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ साठी पात्र" Archived 2016-07-26 at the Wayback Machine., आयसीसी, २२ जुलै २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ चे यजमानपद कोलंबोकडे" Archived 2016-11-26 at the Wayback Machine., आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, ३० ऑक्टोबर २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.