हरिवंश नारायण सिंग ( ३० जून इ.स. १९५६) हे एक भारतीय पत्रकार आणि राजकारणी आहेत. ते सध्या राज्यसभेचे उपसभापती आहेत.
सुरुवातीचे जीवन
त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, आणि पत्रकारितेत पदविका देखील घेतली आहे. ते रांची येथे राहतात.[१][२]
पत्रकारिता
द टाइम्स ऑफ इंडियापासून सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रकाशनांत काम केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे अतिरिक्त मीडिया सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. इ.स. १९८९ मध्ये ते हिंदी प्रकाशन प्रभात खबरमधे सामील झाले आणि ते प्रसारित करण्याच्या दृष्टीने ते भारतातील अव्वल वर्तमानपत्रांपैकी एक बनले. हे वृत्तपत्र चारा घोटाळ्यासह अनेक हाय-प्रोफाईल घोटाळ्यांच्या तपासणीसाठी प्रसिद्ध होते.[३]
राजकीय कारकीर्द
२०१४ मध्ये जनता दलाने (युनायटेड) सिंह यांना सहा वर्षांच्या मुदतीसाठी बिहार राज्यातून राज्यसभेवर उमेदवारी दिली.[४] ८ ऑगस्ट २०१८ रोजी ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून सहा वर्षाच्या मुदतीसाठी राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवडले गेले आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात १२५ विरुद्ध १०५ मतांनी निवडणूक जिंकली.[५] हे पद भूषवणारे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नसलेले चाळीस वर्षांतले पहिले आणि तिसरे व्यक्ती आहेत.
संदर्भ