स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
SRT
ब्रीदवाक्य सा विद्याया विमुक्तये
मराठीमध्ये अर्थ
सर्वांना शिक्षण मोफत आहे
Type शासकीय
स्थापना १७ सप्टेंबर १९९४
विद्यार्थी २४,२४७ (२०२०)[ संदर्भ हवा ]
संकेतस्थळ http://www.srtmun.ac.in



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.[ संदर्भ हवा ] हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीम (SRTMU) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.[ संदर्भ हवा ]

कार्यक्षेत्र

या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणीहिंगोली जिल्हा हे दक्षिण मराठवाड्यातील ४ जिल्हे येतात.

परिसर

नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.[ संदर्भ हवा ][] विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]

डॉ. मनोहर चासकर हे ‌विद्यमान कुलगुरू आहेत. कुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.[ संदर्भ हवा ][]

क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.[ संदर्भ हवा ]

विभाग

विद्यापीठात दुरस्थशिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.[ संदर्भ हवा ]

विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.[ संदर्भ हवा ]

इतिहास

मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातून १९९४ साली निर्मिती.

कुलगुरूंची यादी

अ.क्र. नाव कार्यकाळ
जनार्दन वाघमारे डिसेंबर १९९४-डिसेंबर २००६
कॅप्टन व्ही. व्ही. ढोबळे (प्रभारी)
शेषेराव सुर्यवंशी
मधुकर गायकवाड (प्रभारी)
धनंजय येडेकर
के.एम. कुलकर्णी (प्रभारी)
प्रा. सर्जेराव निमसे २००८-१३
दिलीप उके (प्रभारी) २०१३
पंडित विद्यासागर २०१३-२०१८
१० डॉ.दिलीपराव म्हैसेकर ( प्रभारी ) २०१८-२०१८
११ उद्धव भोसले २०१८-२०२३
१२ प्रकाश महानवर (प्रभारी) २०२३-२४
१३ मनोहर चासकर २०२४ ते आजतागायत

संलग्न विद्यापिठीय महाविद्यालये

विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्राचा नकाशा

अध्यसन

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. गुरू गोविंदसिंह

अधिकारक्षेत्रातील जिल्हे

  1. लातूर
  2. नांदेड
  3. परभणी
  4. हिंगोली

विभाग

  1. औषधनिर्माणशास्त्र
  2. माध्यमशास्त्र
  3. जिवशास्त्र
  4. गणकशास्त्र
  5. भाषा, साहित्य व संस्कृती
  6. वाणिज्य व व्यवस्थापन
  7. समाजशास्त्र
  8. रसायनशास्त्र
  9. पृथ्वीशास्त्र
  10. शिक्षणशास्त्र
  11. तंत्रज्ञान
  12. सुक्ष्म व सादर कला
  13. गणित
  14. भौतिकशास्त्र

सुविधा

  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी

पाठ्यक्रम

  1. नाट्यशास्त्र

हे सुद्धा पहा

नांदेड जिल्हा

संदर्भ

  1. ^ "About University". srtmun.ac.in. 2022-10-29 रोजी पाहिले.
  2. ^ "About University". srtmun.ac.in. 2022-10-29 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!