सोयराबाई भोसले


महाराणी सोयराबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १६७४ - १६८०
अधिकारारोहण पट्टराणी पदाभिषेक
राज्याभिषेक ६ जून १६७४
राजधानी रायगड
पूर्ण नाव सोयराबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
जन्म १६३४
मृत्यू २७ ऑक्टोबर १६८१
रायगड किल्ला, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी महाराणी सईबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
वडील संभाजी मोहिते
पती छत्रपती शिवाजी महाराज
संतती छत्रपती राजाराम महाराज
दीपाबाई
राजघराणे भोसले
चलन होन

महाराणी सोयराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र होते. त्यांना दीपाबाई नावाची एक मुलगी होती.

शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज हे पुढचे छत्रपती व्हावेत अशी त्यांची इच्छा होती . १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा छत्रपती राजाराम महाराज यांना रिक्त सिंहासनावर आला. तिचे सावत्र पुत्र आणि वारस छत्रपती संभाजी महाराज यांना सोयराबाईंचा भाऊ आणि सेना प्रमुख हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने गादीवरून काढून टाकण्यास सक्षम होते. छत्रपती संभाजी महाराज यांनी सोयराबाईकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर, तिने प्रत्येक साधन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अष्टमंडळातील अनुयायांनी ऑगस्ट १६८१ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना विषबाधा करण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले, आणि मंत्र्यांना व कट कारस्थाने करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले. शिवरायांचा संशियित खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपून केला गेला. ही बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच अष्टप्रधान मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले. पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजी महाराजांना छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य अष्टप्रधान मंत्र्यांचे हातात देणे होईल, अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना सोयराबाईंचे व मंत्र्यांचे पत्र मिळताच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना त्याची माहिती कळवली. [ संदर्भ हवा ]

संदर्भ :- श्रीमानयोगी ग्रंथ

कुटुंब

संभाजी मोहिते हे महाराणी सोयराबाई यांचे वडील होते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!