सेंट पीटर्सबर्ग (इंग्लिश: Saint Petersburg) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. फ्लोरिडाच्या पश्चिम भागात मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर टॅम्पा-सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर महानगरामधील एक प्रमुख घटक शहर आहे. २०१० साली सेंट पीतर्सबर्ग शहराची लोकसंख्या २.४४ लाख तर विस्तृत महानगराची लोकसंख्या सुमारे २८ लाख होती.
येथील सौम्य हवा व निसर्गरम्य परिसरामुळे सेंट पीटर्सबर्ग हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे वर्षातील सरासरी ३६० दिवस सूर्यदर्शन होते.
बाह्य दुवे
संदर्भ