सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.
ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
नेव्हा नदीवर व फिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
बाह्य दुवे
|
---|
संघशासित प्रांत | प्रजासत्ताक | |
---|
क्राय | |
---|
ओब्लास्त | |
---|
स्वायत्त ओब्लास्त | |
---|
स्वायत्त ऑक्रूग | |
---|
संघशासित शहरे | |
---|
१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो. |
|
|